मुंबई तक: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्यांचे जे हाल होताहेत, आरोग्य सुविधांवर जो ताण जाणवतोय ते अत्यंत दुर्दैवी आहे. या सर्वासाठी पूर्णतः सरकार जबाबदार आहे. दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती हाताळण्यात सरकार चुकलंय आणि या गोंधळाला पंतप्रधानच जबाबदार असल्याचा आरोप केलाय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी हा आरोप केलाय.
ADVERTISEMENT
या मुलाखतीत राहुल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केलीय. दुसऱ्या लाटेबद्दल तज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याकडेही सरकरारने दुर्लक्ष केल्याचा आरोप राहुल यांनी या मुलाखतीत केलाय. कोव्हिड महामारीचा फटका सगळ्या जगाला बसलाय. भारतात सर्वत्र रांगा आहेत. ऑक्सिजन सिलेंडर, औषधं, हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्याबरोबरच स्मशानातही रांगा लागल्या आहेत. ही सर्व पंतप्रधानांची चूक असल्याचं राहुल गांधी यांचं मत आहे. केंद्र सरकार कोव्हिड महामारी समजून घेण्यात आणि परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः चूकलंय. पुन्हा पुन्हा इशारा मिळूनही अगदी सुरुवातीपासूनच सरकारने चूक केलीय. फक्त माझ्याच बाबत नाही तर इतरांनीही जेव्हा याबाबत सरकारला या आपत्तीबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय.
मोदी सरकारने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एअरपोर्टवरुन हा व्हायरस देशात शिरू दिला. त्यानंतर घाबरुन जाऊन कोणत्याही चर्चेशिवायच देशात सर्वात कठोर लॉकडाऊन लावला. ज्यामध्ये मजूरांचे हाल झाले. गरीबांना हजारो किलोमीटर पायी तुडवत घर गाठावं लागलं. कुठलीही मदत त्यांना देण्यात आली नाही. तेव्हा महाराभारताच्या युद्धाप्रमाणे 21 दिवसांत या व्हायरसवर मात करणार असल्याचं विधानही पंतप्रधानांनी केलं होतं. हा व्हयरस परिस्थितीशी जुळवून घेणारा लवचिक पण कठोर प्रतिस्पर्धी असल्याचं मानून, त्याच्याशी अत्यंत विनम्रपणे लढणं हा मार्ग असल्याचं मतही राहुल गांधी यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. भारताचा बचाव करण्यासाठी आणि तयारीसाठी एक संपूर्ण वर्ष पंतप्रधानांकडे होतं पण त्यांनी काय केलं? सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, हॉस्पिटल बेड , चाचण्यांची सुविधा वाढवल्या का? असे सवालही त्यांनी या मुलाखतीत उपस्थतित केले. जगातले इतर देश दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सरकारने भारतातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला का ?
गेल्यावर्षीच्या भयंकर स्वप्नातून बाहेर पडणं हे सुदैव आहे. 2021 च्या सुरुवातीला आपल्याला देशात दिवसाला 10 हजार रुग्ण आढळत होते. तेव्हाही आपण पुरेशा चाचण्या करत नव्हतो आणि आताही आपण पुरेशा चाचण्या करत नाही असं म्हणणं राहुल यांनी मांडलं. जम्बो कोव्हिड सेंटर आपण का बंद केले असा सवालही राहुल यांनी या मुलाखतीतून केला. आपण आधीच राष्ट्रीय आपत्तीचा सामना करतोय. फक्त एखादी गोष्टी जाहीर केल्याने काही होत नाही. हे सरकार सर्व जाहीर करतं आणि त्यानंतर गायब होतं असा टोलाही त्यांनी या मुलाखतीत लगावला आहे. आता जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलीय तेव्हा केंद्र सरकारने हा बॉल सोडला आणि तो राज्यांच्या कोर्टात टाकला अशी टीकाही त्यांनी केलीय. त्यांनी राज्यांना आणि तिथल्या जनतेला आत्मनिर्भर केलंय अशी खोचक टीकाही त्यांनी यातून केलीय.
तुम्ही तुमच्यावरच अवलंबून आहात. कोणीच तुम्हाला मदतीला येणार नाही आणि पंतप्रधान तर नाहीच नाही. आत्ताची परिस्थिती आहे ती एकमेकांच्या साथीने आपल्या लोकांना वाचविण्याची असा सल्लाही त्यांनी या मुलाखतीतून दिला आहे.
व्हॅक्सिनेशनबद्दल बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की राज्यांनी केंद्रापेक्षा जास्त किंमतीत का व्हॅक्सिन विकत घ्याव? व्हॅक्सिनच्या किंमतीबाबत हा भेदभाव का असा सवालही राहुल करतात. याचा अर्थ भारताची स्थिती सध्या वादळात अडकलेल्या जहाजाप्रमाणे आहे. असं जहाज जे कोणत्याही माहितीशिवाय समुद्रात प्रवास करतेय. कोरोना हा केवळ संकटाचा एक भाग आहे. खरी समस्या आहे ती ही की भारतात सध्या कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद नाही. भारताच्या यंत्रणेबरोबर 6 वर्षे जे काही झालंय त्यामुळे भारत कोणत्याही मोठ्या संकटाचा सामाना करणं शक्य नसल्याचं राहुल यांचं मत आहे.
ADVERTISEMENT