ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहचल्यावर त्यांचं प्रोटोकॉल प्रमाणे स्वागत करण्यात आलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान मोदी हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.
अमेरिका सरकारच्या वतीने व्यवस्थापन आणि संसाधन उपमंत्री टी एच ब्रायन मॅककॉन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
यावेळी अँड्र्यूज विमानतळावर भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदी यांचे उत्साहात स्वागत केले.
भारतातील अनेक नागरिक हे अमेरिकेत राहतात. अशावेळी आपल्या पंतप्रधानांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी अनेकांनी इथे हजेरी लावली होती.
पंतप्रधान मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेकांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आपला अमेरिका विमान प्रवासातील एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे येथील भारतीय नागरिकांमध्ये बराच उत्साह पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT