ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. हळूहळू त्याचा विनोद कांबळी होत असल्याचं म्हटलं जातं आहे.
पृथ्वीचा सोशल मीडिया इंफ्लुएन्सर सपना गिलसोबत सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाहीये.
गेल्या काही दिवसांपूर्वी सपना गिलला स्थानिक न्यायालयातून जामीन मिळाला होता.
जामिनावर सुटलेल्या सपना गिलने बाहेर येताच, पृथ्वी शॉ विरूद्ध गुन्हा नोंदवत गंभीर आरोप केले आहेत.
सपना गिलने पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप केला आहे. पृथ्वीने चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप तिने केलाय.
आयपीसी कलम 34, 120B, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354, 509 अंतर्गत सपनाने गुन्हा नोंदवला आहे.
पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियाबाहेर आहे. त्यातच या वादामुळे त्याच्या अडचणीत भर पडलीय.
ADVERTISEMENT