Uddhav Thackeray यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचा ‘तो’ फ्लॅट IT विभागाने केला सील

दिव्येश सिंह

• 08:13 AM • 21 Jul 2021

माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचा मुंबईच्या नरीमन पॉईंट येथील फ्लॅट आयकर विभागाने सील केला आहे. benami transaction च्या माध्यमातून मेहता यांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचा IT विभागाला संशय आहे. याच कारणासाठी आयकर विभाग याची चौकशी करत आहे. ज्या फर्मने नरीमन पॉईंटमधला फ्लॅट मेहता यांना कोट्यवधी रुपयांमध्ये विकला त्या […]

Mumbaitak
follow google news

माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचा मुंबईच्या नरीमन पॉईंट येथील फ्लॅट आयकर विभागाने सील केला आहे. benami transaction च्या माध्यमातून मेहता यांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचा IT विभागाला संशय आहे. याच कारणासाठी आयकर विभाग याची चौकशी करत आहे.

हे वाचलं का?

ज्या फर्मने नरीमन पॉईंटमधला फ्लॅट मेहता यांना कोट्यवधी रुपयांमध्ये विकला त्या फर्मला आयकर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फ्लॅटसाठीचा आर्थिक व्यवहार हा बोगस कंपनीच्या माध्यमातून आलेल्या पैशातून झाल्याचा संशय IT विभागाला आहे. Anamitra Properties Pvt Ltd या फर्मकडून मेहता यांनी हा फ्लॅट विकत घेतला आहे.

पुण्याच्या कोथरुडमध्ये या कंपनीचा पत्ता रजिस्टर करण्यात आला असून आयकर विभागाने या पत्त्यावर नोटीस पाठवली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या कंपनीतले दोन भागीदार हे मुंबईतल्या चाळीत राहतात. सूत्रांच्या माहितीनुसार मेहतांना हा फ्लॅट मिळावा यासाठी ही कंपनी तयार करण्यात आली होती. कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये आयकर विभागाला अनेक त्रुटी आढळून आल्या असून शेअर होल्डर्सच्या नावावर आयकर परतावा न भरल्याचं प्रकरण प्रलंबित असल्याचं समोर आलंय.

१०७६ स्क्वे. फिटचा हा फ्लॅट अजॉय मेहता यांनी ५ कोटी ३३ लाखांना विकत घेतला होता. हा फ्लॅट Anamitra Properties Pvt Ltd कंपनीने २००९ साली ४ कोटींना विकत घेतल्याचं कागदपत्रांवर दाखवण्यात आलं होतं. या कंपनीचा शेअरहोल्डर कमलेश सिंग याच्याकडे ९९ टक्के मालकी हक्क असून तो मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जवळील श्यामनारायण यादव चाळीत राहतो असंही समोर आलंय. या कंपनीचा आणखी एक शेअरहोल्डर दिपेश सिंग याने एकदा IT returns दाखल केला असून त्याची मिळकत १ कोटींच्या घरात दाखवण्यात आली आहे. हे दोन्ही शेअरहोल्डर साधारण कमाई करणारी माणसं असून त्यांच्या नावावर जास्त मिळकत दाखवून या फ्लॅटच्या व्यवहारासाठी ही कंपनी तयार करण्यात आल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp