ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC मध्ये असणाऱ्या Mercedes-Benz च्या प्लांटमध्ये अचानक बिबट्या घुसला
कर्मचाऱ्यांनी जेव्हा बिबट्याला कंपनीत घुसल्याचं पाहिलं तेव्हा एकच गोंधळ उडाला.
कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती वनविभागाला आणि पोलिसांना दिली.
सकाळी साडे पाच वाजता हा बिबट्या कंपनीत शिरला होता. जवळजवळ दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.
सुरुवातीला वनविभागाच्या टीमने डॉट इंजेक्शनच्या मदतीने बिबट्याला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात टाकून त्याला जुन्नर जवळील घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.
ADVERTISEMENT