साहेब, तुमच्यासाठी काय पण, असं म्हणत राजकीय नेत्यांशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांची चर्चा नेहमीच होतं असते. असंच काहीसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत घडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुण्यातील एका चाहत्याने चक्क त्यांचं मंदिरचं उभारलं आहे. सध्या पुण्यात याचीच चर्चा होतं आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका चाहत्याने मोदींचं मंदिर उभारलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मंदिरांचं लोकापर्ण करण्यात आलं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचं मंदिर हा चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील औंध भागामधील परिहार चौकाजवळ मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्यानं हे मंदिर उभारलं आहे.
पुतळा कसा बनवला? किती खर्च झाला?
पिंपरी-चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी जयपूरमधून नरेंद्र मोदींचा पुतळा तयार करुन घेतला. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी औंधमधीलच ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता लावलेली आहे.
मंदिराबाहेर असलेल्या फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाबद्दलचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
मयूर मुंढे यांनी का उभारलं मोदींचं मंदिर?
‘या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदिर उभारलं आहे’, अशी भावना मयूर मुंढेनी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी त्याच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदी विष्णूचे ११वे अवतार
पंतप्रधान मोदींचं भाजप नेते आणि कार्यकर्ते नेहमीच कौतुक करतात. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदींची स्तुती करणारं एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये त्यांनी ‘नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे, असं म्हटलं होतं. तर काही दिवसांपूर्वीच केलेल्या ट्विटमध्ये हे मोदी युग सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
ADVERTISEMENT