आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला? पोलिसांना नेमका काय संशय? स्वारगेट प्रकरणात नेमकं काय समोर आलं?

न्यायालयात पुणे पोलिसांनी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाबाबत जोरदार युक्तिवाद पोलिसांनी केला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Mar 2025 (अपडेटेड: 01 Mar 2025, 08:09 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्वारगेट प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला?

point

न्यायालयातील युक्तिवादात पोलीस नेमकं काय म्हणाले?

point

आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी कशी मिळाली?

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दद्दात्रेय रामदास गाडेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला पुण्यातील शिरूर तहसीलमधून अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केलं, तेव्हा न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी सकाळी आरोपी गाडेने तरूणीवर बलात्कार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तेरा पथकं तयार केली होती आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होतं. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

हे वाचलं का?

न्यायालयात पुणे पोलिसांनी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाबाबत जोरदार युक्तिवाद पोलिसांनी केला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपीच्या हातात एक मोबाईल फोनही दिसला होता. त्याचे कपडे आणि मोबाईल जप्त करणं गरजेचं आहे. त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी गरजेची आहे. त्यानं यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का, याची चौकशी करणे आवश्यक आहे. त्याच्यासोबत कोणी भागीदार आहे का? या पैलूंचा तपास करणं आवश्यक आहे असं पोलिसांनी म्हटलं.

हे ही वाचा >> Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टातील A टू Z युक्तिवाद!

पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीकडून त्याला इतके दिवस कोण आश्रय देत होतं याचीही माहिती गोळा करायची आहे. हा आरोपी एक सराईत गुन्हेगार आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध दरोड्याच्या एका गुन्ह्यासह सहा गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरण सोडता, त्याचे सर्व गुन्हे महिलांविरुद्ध आहेत. त्यामुळे त्याला 14 दिवसांच्या रिमांडवर घेणं आवश्यक आहे असं पोलिसांनी म्हटलं, त्यानंतर सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रिमांड मंजूर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आरोपी गावाजवळील एका वृद्ध महिलेच्या झोपडीत पाणी पिण्यासाठी गेला होता. त्यानंतर पोलिसांना त्याचा पुढचा पत्ता सापडत नव्हता, घेता आला नाही. तसंच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मानेवर काही खुणा आढळून आल्या आहेत. पोलीस आता वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत.

आरोपीला कसं पकडलं?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग, चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप

आरोपी गाडे शिरूर तालुक्यातील एका शेतात लपून बसला होता. गुरुवारपासून पुणे पोलिसांची 13 पथकं त्याचा शोध घेत होती. शिरूर तालुक्यातील त्याच्या गावीही पोलिसांनी छापा टाकला. रात्री 12 वाजताच्या सुमारास, गाडे यांनी गुणाट गावातील एका घराचा दरवाजा ठोठावला आणि पाणी मागितले. त्याला भूक लागली होती, म्हणून पाणी पिऊन तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याच वेळी खबऱ्याने त्याच्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. डीसीपी निखिल पिंगळे यांनी आयटीला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला गावाजवळील एका शेतात शोधून काढलं. गुरुवारीच पोलिसांनी हिस्ट्रीशीटर दत्ताची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होतं. एवढंच नाही, तर आरोपींना पकडण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली. 

    follow whatsapp