पुणे : ग्राहकांकडून 3000 घ्यायचे अन् महिलांना द्यायचे फक्त 500; लॉजमध्येच सुरू केला कुंटणखाना

मुंबई तक

• 07:49 AM • 07 Dec 2021

मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नीकडून सुरू असलेल्या देहविक्रीच्या घटना चर्चेत असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्येच सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 10 महिलांची सुटका केली असुन, एकाला अटक केली आहे. लॉजचा मॅनेजरच महिलांकडून देहविक्री करण्यास भाग पाडत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. देहुरोड परिसरात […]

Mumbaitak
follow google news

मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नीकडून सुरू असलेल्या देहविक्रीच्या घटना चर्चेत असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्येच सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 10 महिलांची सुटका केली असुन, एकाला अटक केली आहे. लॉजचा मॅनेजरच महिलांकडून देहविक्री करण्यास भाग पाडत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचलं का?

देहुरोड परिसरात मुंबई-बुंगळुरू महामार्गावर असलेल्या हॉटेल द्वारका लॉजिंगमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शोखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक शाखेच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 13 इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नी करत होते देहविक्रीचा गोरखधंदा; तीन महिलांची सुटका

पोलिसांच्या पथकाने अचानक हॉटेल द्वारका लॉजवर धाड टाकली. लॉजची झाडाझडती घेताना पोलिसांना आतमध्ये 10 महिला आढळून आल्या. यात 4 महिला या पश्चिम बंगालमधील आहेत. तर 2 कर्नाटक, 1 आसाममधील आणि 3 महिला महाराष्ट्रातीलच आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लॉजचा मॅनेजरच या महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री करुन घ्यायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एजंट ग्राहकांकडून 3 हजार रुपये घ्यायचे आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना 500 रुपये द्यायचे. छापेमारी करताना पोलिसांनी लॉजमधून 2 मोबाईलसह रोख 25 हजार 700 रुपये जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी मॅनेजर गविरंगा गौडा (वय 38) याला अटक केली आहे. तर सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुण्यातील एका स्वंयसेवी संस्थेकडे सोपवलं आहे. नंतर या महिलांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं जाणार आहे.

Sex Racket In Mumbai : अभिनेत्रीसह प्रसिद्ध मॉडल्सचा समावेश; जुहूतील हॉटेलवर पोलिसांची धाड

गेल्या आठवड्यातही अशाच प्रकार आला होता समोर…

गेल्या आठवड्यातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशीच कारवाई करत एका देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पिंपरी येथील हॉटेल जिंजरलगत सुरू असलेल्या ‘Oregano SPA’ सलूनमध्ये हा अवैध धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापेमारी केली होती. पोलिसांनी 3 पीडित महिलांची सदर ठिकाणावरून सुटका केली होती. ज्यामध्ये 2 महिला नागालँडच्या, तर एक महाराष्ट्रीय होती.

    follow whatsapp