सिंधुदुर्ग: मागील अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने (Rain) आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मागील 24 तळ कोकणात पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे मुंबईतही (Mumbai) पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (Rain forecast)
ADVERTISEMENT
दरम्यान, तळ कोकणातील वैभववाडी तालुक्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच करुळ घाट खचल्याने या मार्गावरील देखील वाहतूक ठप्प झाली.
मागील पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात रविवार (11 जुलै) पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी सकाळपर्यंत 203 मिमी इतका पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आला असून. सुख, शांती, गोठणासह सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
सुख नदीला आलेल्या पुरामुळे उंबर्डे कातकरवाडी येथे रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे उंबर्डे-दिगशी मार्ग बंद होता. या मार्गावरील वाहतूक तिथवली मार्गे वळविण्यात आली होती.
तर कुसूर सुतारवाडीनजीक पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कुसूर-भुईबावडा मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प झाली होती. ही वाहतूक उंबर्डेमार्गे वळविण्यात आली आहे.
करुळ घाट खचला
मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सोमवारी सकाळी करुळ घाट खचला. चेकपोस्टपासून तीन किमी अंतरावर हा घाट खचला आहे. दुपारपर्यंत घाटात ऐकेरी वाहतूक सुरू होती. पण घाटातीला धोका पाहून सायंकाळी हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. आता 26 जुलैपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग सुशेगाद
तळेरे-कोल्हापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो. मात्र, या विभागाची यंत्रणाच तालुक्यात कार्यरत नाही. रविवारी सकाळी याच मार्गावरील करुळ घाट खचल्यानंतरही या विभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी फिरकले नव्हते. त्यांच्या विभागाचे काम पोलिसांनी केले. खचलेल्या ठिकाणी पोलिसांनी बँरेकेट व रिप्लेक्टर लावून वाहनचालकांना सावध केले.
ADVERTISEMENT