Vasai-Virar मध्ये पावसाची जोरदार बॅटींग, नवी मुंबईत झाड गाडीवर कोसळून नुकसान

मुंबई तक

• 02:52 AM • 12 Jun 2021

एकीकडे मुंबईत धमाकेदार एंट्री घेतलेल्या मान्सूनने तिकडे वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे परिसरातही धुमाकूळ घातला आहे. वसई-विरार, नालासोपारा भागात पावसाची दमदार बॅटींग पहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून या भागात विजेच्या गडगडाटासह पावसाची संततधार कायम आहे, ज्यामुळे अनेक रस्ते सध्या जलमय झाले आहेत. हवामान विभागाने मुंबईसोबत पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा दिला होता. मागच्या २४ तासात […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे मुंबईत धमाकेदार एंट्री घेतलेल्या मान्सूनने तिकडे वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे परिसरातही धुमाकूळ घातला आहे. वसई-विरार, नालासोपारा भागात पावसाची दमदार बॅटींग पहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून या भागात विजेच्या गडगडाटासह पावसाची संततधार कायम आहे, ज्यामुळे अनेक रस्ते सध्या जलमय झाले आहेत.

हे वाचलं का?

हवामान विभागाने मुंबईसोबत पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा दिला होता. मागच्या २४ तासात वसई तालुक्यात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत या भागात एकूण १७४ मिमी पाऊस पडलाय. वसई-विरार, नालासोपारामधील अनेक सखल भाग या पावसामुळे जलमय झाले असून पालिकेचा नालेसफाईचा दावा या पावसाने फोल ठरवला आहे.

दुसरीकडे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातही फाम सोसायटीत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड गाडीवर पडून चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालंय.

ठाण्यातही पावसाच्या दमदार हजेरीमुळे सर्व महत्वाचे रस्ते जलमय झाल्याचं पहायला मिळालं. वंदना एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक गाड्यात यात अडकून बंद पडत आहेत. ठाण्यात पालिकेच्या वतीने पंपिंगचं काम होताना कुठेही दिसलं नाही, पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरात पाणी साचण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp