राज ठाकरेंना औरंगाबाद सभेपूर्वीच झटका; पोलिसांच्या आदेशामुळे सभेवरही प्रश्नचिन्ह

मुंबई तक

• 04:42 AM • 26 Apr 2022

मशिदींवरील भोंगे हटवण्याचा कार्यक्रमावर अजेंड्यावर घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात […]

Mumbaitak
follow google news

मशिदींवरील भोंगे हटवण्याचा कार्यक्रमावर अजेंड्यावर घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

हे वाचलं का?

पुणे दौऱ्यावर असतानाच राज ठाकरे यांनी आगामी काळातील दौऱ्यांबद्दल माहिती दिली होती. औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादमधील सभेची मनसेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. मात्र, सभेची घोषणा झाल्यानंतर औरंगाबादेतील विविध पक्ष-संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या सभेचाही आदेशात उल्लेख केलेला आहे. मनसेकडून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्याला विविध पक्ष, संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांकडून आंदोलनं केली जाण्याची शक्यता आहे.

संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निर्दशने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

हा जमावबंदी आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २५ एप्रिल २०२२ पासून ते ९ मे २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी जिल्हाध्यक्ष भाजपत

राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी मनसेला औरंगाबादमध्ये झटका बसला आहे. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. ते मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ऐन सभेच्या तोंडावरच दशरथे यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा पक्षाला धक्का मानला जात आहे. सुहास दशरथे यांची चार महिन्यांपूर्वीच जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यत आली होती.

    follow whatsapp