मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला. औरंगाबाद पोलिसांकडे सभेच्या परवानगीचा अर्ज प्रलंबित होता. अखेर आज पोलिसांनी काही अटींसह मनसेला सभा घेण्यास परवानगी दिली. औरंगाबादेतील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा झाली होती.
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी मनसे सज्ज, जाणून घ्या काय आहे मनसेचा R प्लान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी काय आहेत अटी?
ही जाहीर सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणेदहा या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ यांच्यात बदल करू नये.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि परत जाताना कोणतीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी
सभेसाठी बोलवलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याची आणि मार्ग न बदलण्याच्या सूचना देण्यात याव्यात. त्या वाहनांनी शहरात येताना, शहरात आणि शहराबाहेर जाताना रस्त्यांवरच्या विहित मर्यादेचं पालन करावं.
सभेला येणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार, दुचाकी वाहने किंवा इतर कोणतंही वाहन पार्किंगसाठी नेमून दिलेल्या जागेतच पार्क करावं. त्यासंबंधीच्या सूचना देण्यात याव्यात.
कार्यक्रमादरम्यान कोणतंही शस्त्र बाळगणं, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा त्यांचं प्रदर्शन करून नये. शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये नये.
या सभेच्या सर्व अटी सहभागी होणाऱ्या सगळ्यांना कळवण्याची जबाबदारी ही संयोजकांची असणार आहे
कार्यक्रमासाठी स्वयंसेवक नेमण्यात यावेत. तसंच त्यांची नावं, सभेसाठी औरंगाबादच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नावं, शहर, गावांना अनुसरून संख्या त्यांचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग. येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही सगळी माहिती पोलिसांना सभेच्या एक दिवस आधी द्यावी
सभा स्थानाच्या आसन व्यवस्थेची कमाल मर्यादा १५ हजार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करून ढकलाढकली झाल्यास, अव्यवस्था किंवा गोंधळ, चेंगराचेंगरी झाल्यास त्यासाठी संयोजकांना जबाबदार धरलं जाईल.
सभा स्थानी सुव्यस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या मजबूत बॅरेकिटेस उभारावेत. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना राहिल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी
सभेच्या दरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा-परंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमाव होणार नाही अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घेतली जावी.
सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश आणि ध्वनी प्रदूषण नियम २०० नुसार परिशिष्ट नियम पाळावेत. आवाजाच्या मर्यादेचा भंग केला तर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्षे मुदतीच्या तुरुंगाची आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा आहे.
आणखी काय आहेत अटी?
सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदाहरणार्थ बस सेवा, अँब्युलन्स, दवाखाना, मेडिकल, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दळण-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी
सभेच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची सूचना सर्व संयोजक, वक्ते आणि सभेला येणाऱ्या बंधनकारक राहणार आहे
सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरूषांसाठी स्वतंक्ष आसन व्यवस्था असणं, पिण्याचं पाणी, स्वतंत्र स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी.
सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनीक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात यावी आणि विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.
हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी घालून दिलेल्या अटींचं आणि शर्थींचं उल्लंघन केलं, कार्यक्रमांचे सर्व संयोजक आणि वक्ते यांनी सगळ्यांनी करणं बंधनकारक आहे. या नियमांचं उल्लंघन झालं तर सदरची नोटीस ही न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ADVERTISEMENT