Raj Thackeray Mumbai : "निवडून आलेल्यांनाच स्वत:वर विश्वास बसेना...", विधानसभेवरुन महायुतीवर निशाणा?

पदाधिकाऱ्यांना बोलताना राज ठाकरे म्हणाले, निकालावर कुणालाच विश्वास बसेना. जे निवडून आले आहेत त्यांनाही निकालावर विश्वास बसत नाही. तेच रोज आपल्या बायकोला चिमटा घ्यायला सांगतात असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला.

Mumbai Tak

मुंबई तक

30 Jan 2025 (अपडेटेड: 30 Jan 2025, 01:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर पहिल्यांदाच बोलले

point

"जे निवडून आले त्यांना स्वत:वर विश्वास बसेना"

point

बाळासाहेब थोरात, राजू पाटील यांचं दिलं उदाहरण

Raj Thackeray Mumbai : राज ठाकरे यांनी आज वरळीमध्ये पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्रमकपणे बोलले. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कुणाचाच विश्वास बसू शकत नाही, राज्यात अनेक ठिकाणी समोर आलेले आकडे हे न पटणारे आहेत असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात एवढं मोठं यश मिळूनही शांतता होती असं म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीला मिळालेल्या यशावर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ajit Pawar Beed : कमरेला कट्टे लावून फिरणाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम, बाजूला मुंडे उभे असताना म्हणाले...

राज ठाकरे म्हणाले, "शरद पवार यांचे लोकसभेत 8 खासदार आले आणि विधानसभेत फक्त 10 आमदार आले. आणि ज्या अजित पवार यांचे 2-4 आमदार येतील की नाही अशी शंका असताना त्यांचे थेट 42 आमदार निवडून आले. बाळासाहेब थोरात यांच्यासारखे 8 वेळा निवडून आलेले नेते पडले" असं म्हणत राज ठाकरे यांनी निकालावर शंका उपस्थित केली आहे. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या काही उमेदावारंचा उल्लेख करत सांगितलं की, राजू पाटील यांच्या कुटुंबातील लोकांना कायम ज्या गावातून मतदान पडत आलं आहे, त्या गावात त्यांना एकही मत पडलं नाही. 

हे ही वाचा >> Thane Crime News : 90 हजार रुपयांसाठी पोटच्या गोळ्याला विकलं? आजीच्या तक्रारीमुळे...

राज ठाकरे म्हणाले, निकालावर कुणालाच विश्वास बसेना. जे निवडून आले आहेत त्यांनाही निकालावर विश्वास बसत नाही. तेच रोज आपल्या बायकोला चिमटा घ्यायला सांगतात असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावला.

राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज ठाकरे यांचं हे पहिलंच राजकीय सभेतील जाहीर भाषण होतं. राज्यातील पदाधिकार्‍यांनी या सभेला हजेरी लावली होती. यापूर्वी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलतानाही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, क्रिकेटसारखं राजकारणात थर्ड अंपायर असता तर निकाल वेगळे असते.

    follow whatsapp