Raj Thackeray Mumbai : राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना भाजप आणि महायुतीवर तुफान हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. विधानसभेत राज ठाकरे महायुतीसोबत अशीही चर्चा होती. मात्र, नंतर चित्र एकदमच बदललं. राज ठाकरे यांनी आता महायुतीवर तुफान फटकेबाजी करण्यास सुरूवात केल्याचं दिसतंय. तसंच आपल्यावर भूमिका बदलल्याचा आरोप करणाऱ्यांनाही सवाल करा असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपने ज्या नेत्यांवर टीका केली होती, नंतर त्यांनाच भाजपने कसं सोबत घेतलं हे सांगताना अनेक नेत्यांची उदाहरणं दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Raj Thackeray Mumbai : "निवडून आलेल्यांनाच स्वत:वर विश्वास बसेना...", विधानसभेवरुन महायुतीवर निशाणा?
हेमंत बिस्वा शर्मा, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, नारायण राणे, अशोक चव्हाण या लोकांवर भाजपने गंभीर आरोप केले. मात्र याच लोकांना भाजपने नंतर सोबत घेतलं, मंत्री केलं मुख्यमंत्री केलं. यांनी भूमिका बददली नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, नंतर त्यांना सोबत घेतलं असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट मोदींवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा >>Ajit Pawar Beed : कमरेला कट्टे लावून फिरणाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम, बाजूला मुंडे उभे असताना म्हणाले...
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांवर आरोप केले पण आज तेच लोक त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे असंही म्हणाले की, सोमय्या आणि फडणवीसांनी आपल्यावर आरोप करावे असं लोकांना वाटत असेल, जेणेकरून ते आत म्हणजे मंत्रिमंडळात घेतील असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
