Rajyasabha Election राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या विविध चर्चांना अखेर शिवसेनेनं पूर्णविराम दिला आहे. संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेनेचे मावळे आहेत. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला संधी दिली आहे असं संजय राऊत यांनी आज जाहीर केलं आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं संजय राऊत यांनी सांगितलं. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढणार आहे दोन्ही उमेदवार विजयी होतील.
कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात, असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Rajya Sabha Election: संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा, ‘या’ जागेवरुन अपक्ष लढणार!
संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं.”
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.
शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल ३० वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
ADVERTISEMENT