स्टॉक मार्केटचे बिगबुल मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. त्यांची वयाच्या 62 व्या वर्षी प्राणज्योत मालावली. त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून हजारो कोटी कमावले. 5 हजार रुपये गुंतवून राकेश झुनझुनवाला अब्जाधीश झाले. शेअर मार्केटमधील बहुचर्चित हर्षद मेहता याने केलेल्या घोटाळ्यादरम्यान 1992 साली त्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली होती.
ADVERTISEMENT
हर्षद मेहता स्कॅमदरम्यान कमावले कोट्यवधी रुपये
नव्वदच्या दशकात हर्षद मेहतांच्या स्टॉक मार्केटमध्ये दबदबा होता. 1992 साली हर्षद मेहता घोटाळ्यादरम्यान झुनझुनवाला यांनी स्टॉक शॉर्ट करून खूप कमाई केली होती. ते बियर ग्रुपचे सदस्य होते आणि यादरम्यान त्यांना मोठा फायदा झाला होता. त्याकाळी बुल आणि बियर असे गट सक्रिय होते. बियर ग्रुपमध्ये झुनझुनवाला हे नाव प्रसिद्ध होते.
शेअर्स विकून कमावले पैसे
राकेश यांनी शेअर्स विकून सर्वाधिक पैसे कमावल्याचे सांगितले. हर्षद मेहता घोटाळ्याच्या वेळी त्यांनी मंदीच्या काळातही सुमारे 30-35 कोटी रुपये कमावले होते. मी बाजारातील वास्तव पाहतो असे ते म्हणाले. बाजाराच्या ट्रेंडनुसार ते पैसे गुंतवतात. त्यांनी सांगितले की, माझ्याकडे 40 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे, मी ते शेअर्स मार्केट बघून विकले. त्यातून कमाई करून पुन्हा शेअर्स विकले गेले. अशा प्रकारे झुनझुनवालाने शेअर्स विकून चांगला पैसा कमावला, असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं.
राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक अगदी ५ हजार रुपयांपासून सुरू केली होती. राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा गुंतवणुकीस सुरुवात केली. ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नफा कमावला होता.राकेश झुनझुनवाला यांनी टाटा टी चे शेअर ४३ रुपयाने खरेदी केले होते. तीन महिन्यातच त्यांनी प्रति शेअर १४३ रुपये या भावाने विकले होते. त्यातून राकेश झुनझुनवाला तिप्पट नफा झाला होता. टायटन, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रॅण्ड, टाटा मोटर्स, क्रिसील या कंपन्यांमध्ये त्यांची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
राकेश झुनझुनवालांनी चित्रपटांची निर्मितीही केली
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणुकीबरोबरच चित्रपट निर्मितीही केली. श्रीदेवीची मुख्य भूमिका असलेला इंग्लिश विंग्लिश, शमिताभ आणि की अॅण्ड का या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.
ADVERTISEMENT