ADVERTISEMENT
रामानंद सागर कृत रामायणमधील सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया ही आजही प्रेक्षकांना सीता म्हणूनच लक्षात आहे.
दीपिका सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
पण तिने नुकताच फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
दीपिका या फोटोमध्ये स्कूल ड्रेस परिधान केलेली दिसून येत आहे.
यावेळी दीपिकाच्या हातात वाईनचा ग्लास असल्याचंही दिसत आहे.
दीपिकाचे असे फोटो पाहून तिचे चाहते खूपच चिडले आहेत आणि ते तिला ट्रोल करत आहेत.
‘तुम्ही असे कपडे परिधान करायला नको हवे होते. आम्ही तुम्हाला देवीचा दर्जा दिला आहे.’ असं एका यूजरने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT