Sanjay Raut Controversial Statement about CM Shinde : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य विधानावरून संजय राऊत यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये (Nashik) गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना वादावर निकाल देताना एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे-भाजप असा संघर्ष उफाळून आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेवरील शिंदेंचा दावा मान्य केला. या निकालावर भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले.’ शाह यांच्या विधानावर बोलताना खासदार राऊतांनी अश्लाघ्य विधान केलं.
Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं
मुख्यमंत्र्यांबद्दल अश्लाघ्य भाषेत टीका; संजय राऊतांविरुद्ध नाशिक गुन्हा
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे विधान केलं. शाह यांना प्रत्युत्तर देताना राऊतांची जीभ घसरली. ‘शिवसेना फोडण्यासाठी २ हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला, तसेच पातळी सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान राऊत यांनी केले, असं तक्रारदाराने म्हटलं आहे.
युवा सेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी प्रतिष्ठित पदाची बदनामी केली. लौकिकाला बाधा आणली, असं तक्रारीत म्हटलेलं आहे.
Shiv Sena: “अमित शाह महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू”, ठाकरेंचा घणाघात
रविवारी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तावर असल्यानं रात्री उशिरा राऊत यांच्या विरोधात कलम 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईतील पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले होते की, “अमित शाह काय बोलतात हे महाराष्ट्राने कधीही गांभीर्याने घेतलेलं नाही. आता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री.. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का?.. काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं टोक आहे सध्याचं महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. इतकी टोकाची चाटूगिरी या महाराष्ट्रात चालली आहे. आणि ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला ज्ञान देतायेत.”
ADVERTISEMENT