राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा येथे पोटनिवडणूक झाली, या पोट निवडणुकीत भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने तिकिट दिलं. तर भाजपने समाधान आवताडे यांना तिकिट दिलं. ही निवडणूक भाजपने अत्यंत चुरशीची केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील वा भाजपचे इतर दिग्गज नेते असतील सगळ्यांनीच समाधान आवताडे यांचा जोरदार प्रचार केला. या निवडणुकीत काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण ही लढाई महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी होती.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसची गणितं नेमकी कुठे चुकली? भगीरथ भालके यांना भारत भालके यांच्या मृत्यूनंतर सहानुभूती मिळेल आणि ते सहज निवडून येतील असं वाटलं होतं पण तसं घडलं नाही. पंढरपूर- मंगळवेढा या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पराभूत झाले आहेत. समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यात पार पडलेल्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. पहिल्या फेरीपासून 38 व्या फेरीपर्यंत दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली हेदेखील अमान्य करता येणार नाही. पण शेवटी भगीरथ भालके यांचा पराभव झाला. समाधान आवताडे विजयी झाले.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : भाजप आमदार रणजितसिंह मोहीते-पाटलांना कोरोनाची लागण
आता आपण जाणून घेऊया भगीरथ भालके यांच्या पराभवाची नेमकी पाच कारणं काय होती?
1) भारत भालकेंच्या निधनांतर त्यांच्या पत्नीला म्हणजेच भगीरथ भालके यांच्या आईला उमेदवारी द्यावी अशी होती मागणी होत होत होती. मात्र तसं घडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला. ही बाब राष्ट्रवादीने लक्षात घेतली नाही.
2 )डबघाईला आणलेला विठ्ठल साखर कारखाना व शेतकऱ्यांची देणी हा मुद्दाही भगीरथ भालकेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला
3 ) भगीरथ भालके यांचा जनतेशी म्हणावा तसा संपर्क नव्हता. तसंच वडिलांच्या पुण्याईवर आपण निवडून येऊ असं त्यांना वाटलं होतं. भगीरथ भालके यांचा हाच अतिआत्मविश्वास त्यांना या निवडणुकीत नडला. जनसंपर्क कमी असल्याने किंवा कमी पडल्याने तिथल्या जनतेने त्यांना नाकारलं
4 ) निवडणुकीसाठी जेव्हा शेवटचे दोन दिवस उरले होते तेव्हा यंत्रणा ढासळ्याचं आणि कार्यकर्त्यांशी भगीरथ भालकेंचा संपर्क नसल्याचं चित्र होतं ज्याचा फायदा अर्थातच भाजपच्या समाधान आवताडे यांना झाला.
5) कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कमी पडल्याची भावना जनतेच्या मनात दिसून आली, त्यामुळे राज्य सरकारच्या कामगिरीवरची नाराजीही या निवडणुकीत पाहण्यास मिळाली. त्यामुळे भगीरथ भालके यांचा पराभव झाला.
पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्यं ‘कोरोना संवेदनशील’, महाराष्ट्रानं केलं जाहीर
भगीरथ भालके यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अपयशाचाही फटका बसल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने कोरोनाचं संकट नीट हाताळलं नाही. संकटाच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवलं, शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, कोरोना संकटात आर्थिक मदत दिली नाही, आदी मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी ठरले आणि या प्रमुख पाच कारणांचा फायदा भाजपच्या समाधान आवताडेंना आणि तोटा भगीरथ भालकेंना झाला.भाजपचं बेरजेचं गणित
ADVERTISEMENT