औरंगाबादमधून भाजपने नवख्या अतुल सावेंना मंत्री केलं, पण जुन्या जाणत्या संजय शिरसाटांना मागेच राहावं लागलं. उलट आपल्याला ज्युनिअरपुढे सीनिअर नाही, तर आणखी ज्युनिअर व्हावं लागल्याची बोचणी शिरसाट वेळोवेळी बोलून दाखवतात. आता त्याच शिरसाटांच्या आमदारकीला भाजपनं आव्हान दिलंय. शिंदेशाहीच्या या मिशनमुळे शिरसाटांना पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर हमखास निवडून येणाऱ्या शिरसाटांना शिंदे गटात गेल्यानंतर मंत्रिपदच नाही, तर आमदारकीलाही मुकावं लागेल का?
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची राजधानी आणि आमदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबईतून शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे, केवळ एक. तर मराठवाड्याच्या राजधानी तब्बल तीन जणांना मंत्रिपदाची संधी मिळालीये. पण ज्यांच्या मंत्रिपदाबद्दल सर्वाधिक चर्चा होती… निव्वळ चर्चाच नाही, तर मंत्रिपदही निश्चित झालं होतं, त्या संजय शिरसाटांना मात्र शपथ घेता आली नाही.
भाजपने औरंगाबाद शहरातून अतुल सावेंना कॅबिनेट मंत्री केलं. सावेंच्या मंत्रिपदामुळे शहरातली मंत्रिपदाची जागा आधीच अडलीये. त्यामुळे एकाच जिल्ह्यात, शहरात किती मंत्रिपदं देणार, ही गोष्ट शिरसाटांच्या मंत्रिपदाआड येत असल्याचं म्हटलं जातंय. औरंगाबादच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचा आमदार मंत्री झालाय. म्हणजेच शिंदे गट सोबत आला असला, तरी सावेंना मंत्री करून भाजपनं औरंगाबाद ताब्यात घेण्याचं मिशन कायम असल्याचा स्पष्ट संदेश दिलाय.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपूर्वी; किती जणांना दिली जाणार शपथ?
औरंगाबाद पूर्व : संजय शिरसाटांच्या मतदारसंघात आहेत भाजपची समीकरणं?
औरंगाबाद शहरातील प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट हे दोन्ही आमदार शिंदे गटात गेले. जैस्वालांना मंत्रिपदात रस नाही, तर शिरसाटांना मंत्रिपद मिळालं नाही. याचाच अर्थ, भाजपचं मिशन औरंगाबाद जोरात असताना शिंदे गट मात्र बॅकफूटवर गेल्याचं म्हटलं जातंय.
अशातच आता शिरसाटांच्या आमदारकीचाही मुद्दा चर्चेत आलाय. संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेत. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. शिवसेनेच्या तिकीटावर शिरसाटांची उमेदवारी म्हणजे हमखास विजयाचं गणित असं समीकरणच बनलंय. पण गेल्यावेळी शिरसाटांना तगडं आव्हान मिळालं, ते शिंदे गटाकडूनच.
शिंदे गट आदित्य ठाकरेंना युवा सेना प्रमुख पदावरून हटवणार?; एकनाथ शिंदेंकडे खासदाराने केली मागणी
राजू शिंदेंच्या पाठिशी होतं भाजपचं बळ?
२०१९ च्या निवडणुकीत भाजपला युतीमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ हवा होता. त्यासाठी भाजपने आधीपासूनच जोरदार तयारी केली होती. पण मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला. तरीही भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. यामागे भाजपचीच ताकद असल्याचं औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं.
संजय शिरसाट यांना सर्वाधिक ८३,७९२ मतं मिळाली, तर भाजप बंडखोर राजू शिंदे तब्बल ४३,३४७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आले. चाळीस हजाराच्या मताधिक्यानं शिरसाट जिंकले. नंतर युती तुटली. तेव्हापासूनच राजू शिंदेंनी २०२४ ची तयारी सुरू केली. आता शिंदे-फडणवीस सरकार आलंय, पण राजू शिंदेंचं औरंगाबाद पूर्वचं मिशन मात्र सुरूच आहे.
भाजपच्या मिशनमुळे शिरसाटांची आमदारकी धोक्यात?
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतदार, नगरसेवक असलेल्या राजू शिंदेंनी पश्चिममध्ये भाजपचं सशक्त बूथ अभियान हाती घेतलंय. त्यामुळे येत्या निवडणुकीतही शिरसाटांना शिंदेशाहीचं आव्हान मिळणार आहे. आणि यामुळे मंत्रीपद न मिळाल्यानं आधीच अडचणीत असलेल्या शिरसाटांची भाजपच्या मिशनमुळे आमदारकीही धोक्यात येऊ शकते, शिरसाटांचा डबल गेम होऊ शकतो, असं औरंगाबादमधील जाणकारांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT