नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणींवर आज अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
सकाळी अकरा वाजता बियाणी शारदानगर भागातील आपल्या घराबाहेर निघत असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचं कळतंय. दिवसाढवळ्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर अशा पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ पसरली आहे. बियाणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं कारण आणि यात कोणाचा सहभाग आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात बंदोबस्त वाढवला असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत.
बीड: पान टपरीजवळ उभ्या असलेल्या चौघांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू
तीन वर्षांपूर्वी संजय बियाणींना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती. ज्यानंतर बियाणींना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यामुळे खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यवसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच बियाणी यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती, ज्यानंतर त्यांच्यावर आज हल्ला करण्यात आला.
प्रेमापायी संपवलं लाखमोलाचं आयुष्य; 25 वर्षीय इंजिनिअर तरुणाची आत्महत्या
पोलीस या प्रकरणात आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे स्थानिक गुंड गुन्हा करताना या गावठी पिस्तुलांचा सर्रास वापर करतात. या दृष्टीकोनातून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरातील व्यवसायिक वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिरात हल्ला करणाऱ्या आरोपीचं नवी मुंबई कनेक्शन?
ADVERTISEMENT