छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. याच जयंतीच्या निमित्ताने लेखक आणि इतिहास संशोधक करण राजे बांदल यांनी शिववंश नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक नवी माहिती दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच ही माहिती समोर आली आहे. करण राजे बांदल यांनी हा खुलासा केला आहे की छत्रपती संभाजी महाराजांना दोन पत्नी होत्या. एकीचं नाव येसूबाई आणि दुसऱ्या पत्नीचं नाव दुर्गाबाई असं होतं.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले बांदल?
आजवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या दुर्गाबाई यांच्याबद्दल फारच कमी माहिती समोर आली होती. दुर्गाबाई या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मी याबद्दल सखोल संशोधन केलं आहे. विविध इतिहासाचे दस्तावेज, कागदपत्रं तपासले आहेत. विविध पुरावे आणि संदर्भ समोर आल्यानंतर मी या निष्कर्षानंतर पोहचलो आहे की संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी या दुर्गाबाई होत्या. दुर्गाबाई या जाधवराव कुटुंबातील होत्या. रत्नोजी यशवंतराव जाधवराव यांची ती मुलगी.
आणखी काय म्हणाले बांदल?
छत्रपती संभाजी महाराज यांचं आणि दुर्गाबाईंचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांनी 1675 मध्ये ठरवलं होतं. त्यासंदर्भातला लेखी पुरावा आपल्याला सापडला आहे असंही मी माझ्या थिसीसमध्ये लिहिलं आहे असंही बांदल यांनी सांगितलं. एवढंच नाही तर दुर्गाबाईंना 1688 मध्ये मुघलांनी पन्हाळा किल्ल्यावरून अटक केली होती. त्याचेही लेखी पुरावे आहेत असंही बांदल यांनी स्पष्ट केलं.
बांदल यांनी हेदेखील सांगितलं की, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पत्नी दुर्गाबाईंना मुघलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र त्यात ते अपयशी ठरले. बांदल यांनी याबाबत बरंच संशोधन केलं आणि थिसेसमध्येही उल्लेख केला आहे. शिव वंश या पुस्तकातही त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
ADVERTISEMENT