पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. 4 मे पासून राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आपलं आंदोलन सुरु केलं होतं. अशावेळी गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे मात्र गायब होते. त्यामुळे मनसेमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, आता या सगळ्याबाबत स्वत: वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
वसंत मोरे हे काही दिवसांपासून तिरुपती बालाजीला गेले होते. तिथून परतल्यानंतर आज (6 मे) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भोंग्यांबाबत त्यांची नेमकी काय माहिती आहे ती देखील स्पष्ट आहे.
पाहा बालाजीहून परतल्यानंतर वसंत मोरे काय म्हणाले:
‘मी दरवर्षी बालाजीला जातो आणि अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जातो. हे मी दीड महिन्यांपूर्वी बुकिंग केलं होतं. जेव्हा हा सगळा विषय कुठेच नव्हता. त्यामुळे माझा तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आज जवळजवळ 17-18 वर्ष झाली मी बालाजीला जातो. परंतु मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे गेलो नव्हतो. निवडणूक झाल्यावर देखील मी जात असतो.’
‘निवडणूक ही मार्च एप्रिलच्या दरम्यान होणार असे जे संकेत होते. त्यामुळे मला वाटलं की, याच दरम्यान निवडणुका होतील आणि म्हणून त्या हिशोबाने बुकिंग केलं होतं.’
‘ठाण्याच्या सभेच्या आधी राज ठाकरेंनी मला आदल्या दिवशी मुंबईला बोलावलं होतं. मी साहेबांच्या समोर बसलेलो असल्याने मला नाही बोलता नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की, तेव्हा आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. माझ्या सख्ख्या मोठ्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम होता. परंतु साहेबांनी बोलवल्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचं याप्रमाणे मी त्या दिवशीचा माझा घरचा कार्यक्रम रद्द केला. घरच्यांना समजून सांगितलं की, आज मला ठाण्याच्या सभेला जाणं गरजेचं आहे.’
‘मी जर ठाण्याच्या सभेला गेलो नाही तर कार्यकर्ते आणि पक्षामध्ये मोठा संभ्रम होईल. असं सांगून मी ठाणच्या सभेला रवाना झालो होतो.’
‘मी पण एक माणूस आहे मला सुद्धा भावना आहेत. मी दरवर्षी बालाजीला जातो. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला तर लढाई कोणी काय हरत नाही. मला वाटतं माझ्या अनुपस्थितीत सुद्धा मनसैनिक रस्त्यावर होते.’
‘माझ्या इथे आरती वैगरे झाली नाही. माझ्या भागातील मुस्लिम बांधवांना मी निवदेन केलं होतं. त्यामुळे माझ्या भागातील नागरिकांनी पहिल्यापासून अजानचा आवाज बंद केलेला आहे. सकाळची अजान होते ती भोंग्यांशिवयाच होते. शहरात या गोष्टी झालेल्या आहेत. मी उपनगरात मोडतो त्यामुळे इथे काही आरती वैगरे झाली नाही.’
‘स्वामी विवेकानंदांचं ते स्टेट्स मला खूप आवडतं ज्या-ज्या वेळेस माझा संघर्ष होत असतो. त्यामध्ये तुम्ही माझी शेवटची वाक्य घेतली. पहिली वाक्य घेतली नाहीत. ज्या वेळेस संघर्ष होत असतो त्यावेळेस समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलंत. पण मी राजमार्गावर आहे.’
‘मी काल बालाजीला गेलो होतो. आता तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल.. की इथे माझी गाडी आहे जे-जे लोकं बालाजीला जातात त्यांना माहिती आहे की, त्या ठिकाणी कोणताही झेंडा असेल तर ते खाली काढलं जातं. म्हणून मला वाटलं की, जर माझ्या गाडीवरील झेंडा वैगरे काढला तर आणखी संघर्ष होईल. त्यामुळे मी भाड्याची गाडी करुन गेलो होतो.’
‘तिकडे गर्दीत कोणत्या पक्षाचा बॅच वैगरे पाहिला जात नाही. सगळं काढलं जातं. त्यामुळे कालपासून एक बॅच लावलेला आहे आणि दुसरा बॅच खिशात आहे. जेणेकरुन समजा एखादा बॅच पडला तर असं काय व्हायला नको म्हणून दुसरापण बॅच जवळ ठेवलाय.’
‘मी अस्वस्थ नाही फक्त शांत आहे. गेली 13-14 महिने मी दमलोय. माझी धावपळ झाली आहे. मी पक्ष नेता होतो. त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता.’
‘माझ्या प्रभागात सहा मशिदी आहेत. इथे जर पाहिलं तर मशिदींनी सर्व नियमांचं पालन केलेलं पाहायला मिळेल. मी बालाजीला होतो तरी माझं या लोकांशी फोनवरुन बोलणं सुरु होतं.’
‘पक्षांतर्गत कुरघोडी या त्याच वेळेस चालू असतात ज्यावेळी पक्ष मोठा होत असतो आणि मला वाटतं आमच्यात थोडेफार मतभेद झाले आहेत. मतभेद आहेत मनभेद झालेले नाही.’
‘मी पक्ष कार्यालयात जात नाही कारण की, पहिल्या दिवशी जो कार्यक्रम झाला तो मला खटकला. फटाके वाजवण्याचा.. त्या ठिकाणी जी मिरवणूक काढण्यात आली, पेढे वाटण्यात आले. मला असं वाटतं की जे संपर्क कार्यालय मी स्वत: त्या ठिकाणी थांबून राज साहेबांसाठी एक स्पेशल रुम तयार केली. त्यामुळे तिथे जे काही झालं त्यामुळे तिथे गेल्यानंतर माझं मन मला साथ देत नाही. मी थोडा पहिल्यापासून भावनिक आहे. त्या कार्यालयासोबत माझं भावनिक नातं आहे. पण त्या दिवशी तिथे जो काही प्रकार तिकडे घडला तो प्रकार नको व्हायला हवा होता त्यामुळे मला तिकडे जावंसं वाटत नाही.’
राज ठाकरेंच्या ‘उत्तर सभे’नंतर वसंत मोरे हनुमान चालीसा म्हणणार?; पुण्यात काय घडतंय?
‘मी सध्या लोकप्रतिनिधी नाही, शहराचाही पदाधिकारी पण नाही. मी राज्याचा पदाधिकारी आहे. मला साहेबांनी सरचिटणीस पद दिलं आहे पूर्वीपासून. त्यामुळे शहरातील कोअर कमिटी ही 12 जणांची आहे. त्यामुळे ते जे करतील ते पाहूया.’ असं वसंत मोरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT