– समीर शेख, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या हिंजवडी IT पार्क परिसरातून वाहणार्या मुळा नदीच्या काठी असलेल्या एका उंबराच्या झाडावरील फांदीला महिलेचं प्रेत टांगलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. आता या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी मोठा खुलासा केला आहे.
या घटनेबाबतची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याच परिसरातील एका किराणा दुकानाचे व्यापारी असलेले रमेश गेहलोत नामक व्यापाऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश गुन्हे शाखेचे प्रशांत अमृतकर व तसेच शास्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गावामधील लोकांकडून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की कोणी महिला येथून हरवली आहे का. त्यावर होडगे नामक कुटुंबीयांनी हा दावा केला की त्यांच्या परिवारातील 56 वर्षीय सुधा नामक महिला मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता होती.
त्यानंतर पोलिसांनी मृतक महिलेचे प्रेत त्यांच्या परिवारातील सदस्यांना दाखवले असता प्रेताच्या शरीरावर असलेल्या कपड्यावरून तिची ओळख पटवत हा दावा केला की सदरचे प्रेत हे त्यांच्यात कुटुंबातील बेपत्ता असलेल्या मृतक महिलेचे आहे.
त्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती देताना पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, मयत सुधा सदाशिव होडगे या नांदे गावातील ढमाले वस्ती तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे राहणाऱ्या होत्या. त्या 8 महिन्यापूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे पती सदाशिव रामू होडगे यांनी पुणे ग्रामीण पोलिसात तक्रारही नोंद केली होती.
मृतक महिलाचे तिच्या मुलाशी किरकोळ वाद झाला होता आणि त्याचा राग मनात धरून त्या घर सोडून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी संशय व्यक्त केला की, परिसरात आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून त्यांचा मृत्यू झाला असावा व मुळा नदीच्या काठी असलेल्या एका झाडाच्या फांदीवर यांचा हा शव अनेक महीने लटकला गेला असावा.
धक्कादायक ! मुळा नदीकिनारी झाडावर सापडला मुलीचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह, पोलीस तपास सुरु
सध्या मृतक महिलेचे शव फायर ब्रिगेडच्या मदतीने झाडावरून काढण्यात आले असून ते पोस्टमार्टम आणि DNA चाचणीकरिता सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT