महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या योगदानामुळे प्रसिद्ध आहेत. सोशल मिडीयावर अमृता फडणवीस कायम त्यांच्या गाण्यांमुळे आणि संगीत प्रेमामुळे चर्चेत असतात.
ADVERTISEMENT
नुकताच जागतिक महिला दिन पार पडला. या महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीसांचे ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले.
अमृता फडणवीसांच्या या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीसांचे मुक्तहस्ते कौतुक केले आहे.
ट्विट करताना रोहित पवार म्हणतात ‘काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!
महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ नवे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली होती.
https://www.mumbaitak.in/blogs/maharashtra-ex-cm-wife-amruta-fadanvis-special-write-up-on-womens-day-and-trolling-she-face-on-social-media
महिला दिनाच्या मुहूर्तावरच अमृता फडणवीस यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी महिलांचे प्रश्न, महिला सुरक्षा, महिला दिन, सोशल मिडीयावर होणारे महिलांचे ट्रोलिंग या विषयावर मत मांडली होती.
अमृता फडणवीस यांना सोशल मिडीय़ावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. यासंदर्भातही त्यांनी मुंबई तकशी बोलताना म्हटले होते की ‘माझं सोशल मीडिया मी स्वत: हाताळते. तिथलं प्रत्येक मत, विचार माझे स्वत:चेच असतात. मी ख-या आयुष्यात जशी आहे, तशीच मी तिथेही व्यक्त होत असते. त्यामुळे ट्रोलिंगला घाबरायचं कशाला? कर नाही त्याला डर कशाची, हा सवाल मी स्वत:च स्वत:ला विचारत राहते आणि माझ्यावर होणा-या ट्रोलिंगचा सामना करते’
ADVERTISEMENT