केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरकरांना आता कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी मोबाईल हेल्थ लॅब उपलब्ध होणार आहे. नागपूरमध्ये SpiceHealth या कंपनीची ही मोबाईल लॅब रविवारीच दाखल झाली आहे.
ADVERTISEMENT
या लॅबद्वारे 425 रूपयांत प्रतिदिन 2500 लोकांची टेस्ट केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ही लॅब सुरू होईल असे नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
नागपूर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, गेल्या 24 तासात सापडले प्रचंड रुग्ण
नागपूरमध्ये काय आहे स्थिती?
पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये (Nagpur) देखील कोरोनाची (Corona) परिस्थिती ही अत्यंत गंभीर होत चालली आहे. कारण गेल्या काही दिवसात नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. याशिवाय सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे येथील मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या तिसरा लॉकडाऊन (Lockdown) सुरु आहे. असं असून देखील येथील रुग्णांची संख्या काही अटोक्यात आलेली नाही. याउलट येथील रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याचं दिसतं आहे.
मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात तब्बल 7907 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आले आहेत. त्यापैकी 4720 हे नागपूर जिल्ह्यातील शहरी भागातील रुग्ण आहेत. तर 3040 रुग्ण हे ग्रामीण भागात सापडले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये देखील कोरोनाची संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे. त्यामुळे नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट (corona new hotspot) बनला आहे. दरम्यान, नागपूरमध्ये काल एका दिवसात 5130 रुग्ण हे बरे होऊन घरी देखील परतले आहेत.
ADVERTISEMENT