Russia-Ukraine War : गुरुवारी पहाटे सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध तिसरा दिवस उजाडला तरीही सुरूच आहे. संघर्षाची धग कमी झालेली नसून उलट कीवचा पाडाव करण्यासाठी रशिया आणखी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. विशेष लष्करी मोहिमे आडून रशियाकडून युक्रेन होत असलेल्या हल्ल्यांच्या दरम्यान आता ब्रिटन, अमेरिका, युरोपीय युनियनमधील देशांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
Russia Ukraine Crisis : कीवमध्ये रशियाकडून मिसाईल हल्ला; घटनेचा व्हिडीओ आला समोर
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला पाश्चिमात्य देशांकडून विरोध होत आहे. रशिया विरोधात आता पाश्चिमात्य राष्ट्र एकवटताना दिसून येत असून, युरोपीय संघ आणि ब्रिटन नंतर आता कॅनडा, अमेरिका यांच्यासह अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव, रशियन लष्करप्रमुख यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युक्रेनला मदत करण्यावर 27 देश सहमत
राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना अमेरिकेकडून युक्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र जेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव फेटाळत मला शस्त्रास्त्र हवीत असं आवाहन केलं. त्यानंतर आता ब्रिटन, युरोपीय संघ, अमेरिकेसह 27 देशांनी युक्रेनला लष्करी मदत ज्यात शस्त्रास्त्र देण्यावर सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा आणि इतर लष्करी मदत देण्याबद्दलही 27 देशांचं एकमत झालं आहे.
फ्रान्सकडूनही युक्रेनला शस्त्रास्त्रांसह लष्करी मदत पाठवण्यात आली आहे. फ्रान्सने युक्रेनला शस्त्रास्त्र पाठवली असल्याची माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्वीट करून दिली आहे.
युरोपीय संघाने रशियाचा विमान पुरवठा रोखला
रशिया-युक्रेन संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच असून, अनेक देशांनी रशियाविरुद्ध प्रतिबंधात्मक पावलं उचलली आहेत. युरोपीय संघाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह परराष्ट्र मंत्र्यांची संपत्ती गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रशियाला केला जात असलेला हेलिकॉप्टर पुरवठाही बंद केला आहे. युरोपीय युनियनकडून रशियाला होणारा सर्व प्रकाराच्या विमान पुरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेनं युक्रेनसाठी उघडली तिजोरी
अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादतानाच आता युक्रेनसाठी तिजोरी उघडली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भातील एक आदेश जारी केला आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदतीसाठी 350 बिलियन डॉलर्सची देणार आहे. परदेशी सहाय्यता नियमानुसार युक्रेनला मदत करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना दिले होते. त्यानंतर ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT