महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. तसंच त्यांनी कोणत्याही प्रकारे पैसे स्वीकारले नाहीत. असं बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदिवाल कमिशनला सांगितलं आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी कधीही आपल्याला पैसे गोळा करायला सांगितलं नाही असं सचिन वाझेने चांदिवाल कमिशनला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे अॅडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ते सचिन वाझेला प्रश्न विचारले. सचिन वाझे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून प्रश्नांना उत्तर देत होता. तर अनिल देशमुख हे गिरीश कुलकर्णी यांच्या मागे बसले होते.
सचिन वाझे चा यू टर्न अनिल देशमुख यांना मिळणार दिलासा?
काय घडलं कोर्टात? जाणून घ्या..
गिरीश कुलकर्णी – तुमच्या तपासात कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा गृहमंत्रालयाने पैसे देऊन हस्तक्षेप केला होता का?
सचिन वाझे-नाही
गिरीश कुलकर्णी-तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्रालयाला कोणत्याही सदस्याला पैसे दिले का?
सचिन वाझे- नाही
गिरीश कुलकर्णी-अशी कोणतीही वेळ होती का?ज्यावेळी तुम्ही अनिल देशमुख यांना पैसे दिले होते किंवा पैसे ऑफर केले होते?
सचिन वाझे-नाही
गिरीश कुलकर्णी- तुम्ही अनिल देशमुख, त्यांचे सहकारी किंवा कर्मचारी यांना कुणाला पैसे दिले होते का?
सचिन वाझे-नाही
गिरीश कुलकर्णी-अनिल देशमुख यांच्या जवळचा कर्मचारी म्हणून कुंदन शिंदे यांना तुम्ही काही पैसे दिले होते का?
सचिन वाझे- लक्षात नाही
गिरीश कुलकर्णी-तुम्ही कुंदन शिंदेंना पैसे ऑफर केले नव्हते हे बरोबर आहे का?
सचिन वाझे-होय
गिरीश कुलकर्णी-अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे कुठल्याही पैशांची मागणी केली नव्हती हे बरोबर आहे का?
सचिन वाझे-होय हे बरोबर आहे, अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली नाही
गिरीश कुलकर्णी-अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कुठल्याही कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितलेले नाहीत हे बरोबर आहे का?
सचिन वाझे-नाही, व्यक्तीगत पातळीवर माझ्याकडे नाही.
गिरीश कुलकर्णी-अनिल देशमुख यांनी स्वतः किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणी तुम्हाला बार ओनर्स किंवा रेस्तराँ मालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितले होते का?
सचिन वाझे-नाही
गिरीश कुलकर्णी- तुम्ही बारमधून पैसे घेतले नसल्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांच्या कर्मचार्यांना पैसे देण्याचा प्रसंग आला नाही हे बरोबर आहे का?
सचिन वाझे-होय हे बरोबर आहे
सचिन वाझे चा यू टर्न अनिल देशमुख यांना मिळणार दिलासा?
25 नोव्हेंबरला सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर आणखीन एक गौप्यस्फोट केला आहे. मी या संपूर्ण प्रकरणात एक छोटा प्यादं असल्याचा म्हणणाऱ्या वाझेने आयोगासमोर माहितीचा धडाका लावला होता. निलंबित असतानाही अनेक प्रकरणांची तपासणी केल्याची माहिती त्यांनी आयोगाला दिली आहे. तर आज सचिन वाझेने जी उत्तरं दिली आहेत त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळणार का आणि ते तुरुंगातून बाहेर येणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
अनिल देशमुख यांच्यासाठी कोट्यवधींची वसुली करत होता सचिन वाझे, ED चा दावा
ईडीने याआधी हा दावा केला होता की सचिन वाझे हा अनिल देशमुखांसाठी कोट्यवधींची वसुली करत होता. दरम्यान मार्च महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी हा उल्लेख केला होता की सचिन वाझेला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. त्यामुळे हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी एप्रिल महिन्यात राजीनामा दिला. आता सचिन वाझेने यू टर्न घेत अनिल देशमुख यांनी काही खंडणी वगैरे मागितली नाही. पैसे घेतले नाही, टार्गेट दिलं नव्हतं असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT