NIA ने केलेल्या अटकेविरोधात सचिन वाझेंची हायकोर्टात याचिका

मुस्तफा शेख

• 11:56 AM • 15 Mar 2021

NIA ने केलेल्या अटकेविरोधात सचिन वाझे यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. Habeas Corpus याचिका दाखल करत सचिन वाझे यांनी NIA ने केलेल्या अटकेलाच आव्हान दिलं आहे. NIA ने आपल्या विरोधात दाखल केलेली स्फोटकांची केस ही बेकायदेशीर आहे असंही या याचिकेत सचिन वाझेंनी नमूद केलं आहे. तसंच मला अटक करण्याआधी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया […]

Mumbaitak
follow google news

NIA ने केलेल्या अटकेविरोधात सचिन वाझे यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. Habeas Corpus याचिका दाखल करत सचिन वाझे यांनी NIA ने केलेल्या अटकेलाच आव्हान दिलं आहे. NIA ने आपल्या विरोधात दाखल केलेली स्फोटकांची केस ही बेकायदेशीर आहे असंही या याचिकेत सचिन वाझेंनी नमूद केलं आहे. तसंच मला अटक करण्याआधी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही असंही या याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. सुरूवातीला ही कार कुणाची आहे? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. मात्र, विरोधी पक्षाने सभागृहात हे प्रकरण उचलून धरलं तेव्हा याबाबत एक-एक गोष्टी समोर आल्या.

त्यातच अँटेलियाबाहेरली स्कॉर्पिओ कार ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचंही समोर आलं होतं. पण ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्र्याजवळील खाडीत आढळून आला होता. याच प्रकरणी पहिल्यांदा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं. अखेर संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.

याप्रकरणी मनसुख हिरेनची पत्नी विमला हिरेन यांनी वाझेंवर आपल्या पतीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. तसंच असाही दावा केला की, त्यांची स्कॉर्पिओ कार ही नोव्हेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाझे यांच्याकडेच होती. सध्या मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएस तपास करत आहे.

सचिन वाझे अडचणीत आलेलं ख्वाजा युनूस प्रकरण नेमकं आहे तरी काय?

दरम्यान, वाझे हे (13 मार्च) सकाळी एनआयए कार्यालयात 11 वाजता पोहचले होते. त्यानंतर एटीएस आणि क्राईम ब्रांचचे काही अधिकारी देखील तिथे पोहचले होते. यावेळी एनआयएकडून सचिन वाझे यांना याप्रकरणी बरेच प्रश्न विचारण्यात आले. अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयित कार सापडली होती त्याप्रकरणी वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

    follow whatsapp