सचिन वाझे हे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी म्हणून पोलीस दलात बसले होते अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
क्राईम इंटलिजिन्स युनिट हे मुंबई पोलिसांमधलं सर्वात महत्त्वाचं खातं आहे. या खात्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी ठाकरे सरकारने सचिन वाझेंना दिली. कोणत्याही हद्दीत हाय प्रोफाईल घटना घडली की ते प्रकरण CIU कडे येत होती. बादशाह रॅपरचं प्रकरण, ऋतिक रोशनचं प्रकरण हे सगळं CIU कडेच देण्यात आलं होतं. मुंबई पोलीस खात्यात जर आयुक्तांनंतर कुणाला महत्त्व होतं तर ते सचिन वाझेंचं होतं. एक वेगळीच उंचीच सचिन वाझेंना ठाकरे सरकारने दिली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
२००८ मध्ये सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझेंनी काही काळ शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही काम केलं. शिवसेनेतील सक्रिय लोकांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा आलं त्यानंतर सचिन वाझेंना परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. कोरोना सुरू झाला तेव्हा ते कारण पुढे करून सचिन वाझेंना उद्धव ठाकरे सरकारने सेवेत रूजू करून घेतलं. सचिन वाझे हे हायकोर्टाच्या आदेशाने निलंबित होते त्यांना ठाकरे सरकारने सेवेत सामावून घेतलं. २०१७ मध्ये एका खंडणीच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते तरीही
सचिन वाझे यांनीच ‘त्या’ स्कॉर्पिओचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केले?
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हादेखील एटीएसकडून काढून NIA कडे देण्यात यावा अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. माझा एटीएसवर मुळीच अविश्वास नाही मात्र त्यांच्यावर दबाव आहे असं दिसतं आहे. तसंच सचिन वाझेंना आदेश देणारं, सगळी कारस्थानं करण्यासाठी संमती कोण देत होतं ते शोधणं आवश्यक आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली ते ठीक आहे पण सचिन वाझेंना वाचवलं का गेलं होतं? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे.
ADVERTISEMENT