मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया प्रकरणात आरोपी सचिन वाझेबाबत आता एकामागून एक असे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, एनएआयच्या आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, वाझे हा एका कॉल गर्लला दरमहा 50 हजार रुपये पगार देत असत. एवढेच नाही तर त्याने त्या महिलेला एका कंपनीत संचालक देखील बनवलं होतं. एनआयएच्या चौकशीत संबंधित महिलेने हा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
तिने याबाबत अशी माहिती दिली आहे की, ती सचिन वाझे याला पहिल्यांदा 2011 साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटली होती. तेव्हापासून ती सतत वाझेच्या संपर्कात होती. सुरुवातीला वाझेने त्या महिलेला स्वत:चं काही तरी वेगळं नाव सांगितलं होतं. पण नंतर त्याने तिला आपलं खरं नाव सांगितलं होतं.
‘ती’ महिला एका कंपनीत होती संचालक
चौकशीदरम्यान महिलेने NIA ला सांगितले की, तिला वाझेने एका कंपनीत संचालक देखील बनवलं होतं. दरम्यान, यावेळी तिने असंही म्हटलं की, ‘कंपनीच्या खात्यात जमा केलेले 1.25 कोटी रुपये नेमके कोठून आले होते हे आपल्याला माहित नाही.’
‘वाझे यांनी नोकरी सोडण्यास सांगितले होते’
महिलेने आपल्या जबाबात असं म्हटलं आहे की, ती एक एस्कॉर्ट होती. पण वाझेने तिला एस्कॉर्टची नोकरी सोडण्यास सांगितले होतं. त्या बदल्यात तो तिला ऑगस्ट 2020 पासून दरमहा 50 हजार रुपये देत होता.
एवढेच नव्हे तर वाझेने तिला या कमाईतून मालकीच्या दोन कंपन्या उघडण्याचा सल्लाही दिला होता. महिलेने सांगितले की, ‘वाझेने तिला 50 हजार रुपयांव्यतिरिक्त कोणतेही रोख पैसे दिलेले नाहीत. पण काही पैसे तिच्या बचत खात्यात किंवा दोन कंपन्यांच्या चालू खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते.’
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित प्रश्नावर महिलेने सांगितले की, ‘वाझेनी तिला 18 ते 19 फेब्रुवारी दरम्यान 40 लाख आणि 36 लाख रुपयांच्या नोटा दिल्या होत्या. बॅगामध्ये भरून या नोटा आणण्यात आल्या होत्या.’ तब्बल 76 लाख रुपयांच्या नोट मोजण्यासाठी वाझेने त्या महिलेकडे दिल्या होत्या.
दरम्यान, जेव्हा महिलेला RTGS बद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ‘ज्या संस्थांमधून तिच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले त्याबद्दल तिला काहीही माहिती नाही.’
Antilia Case : धुळीने माखलेल्या Scorpio च्या नव्या Number Plate कडे रिलायन्सच्या सुरक्षा प्रमुखाचं लक्ष गेलं अन..
महिलेची फर्म का तयार झाली नाही?
मयंक ऑटोमेशन नावाच्या दुसऱ्या फर्मच्या चालू खात्यात 1.25 कोटी रुपये जमा करण्याच्या प्रश्नावर महिलेने सांगितले की, ‘तिला याबद्दल काहीही माहिती नाही. वाझेला त्याबाबत माहिती असेल. कारण मी वाझेला खात्यातील व्यवहारासाठी सही केलेल कोरे चेक द्यायची.’
एनआयएने गेल्या आठवड्यात अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेनच्या हत्येशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये महिलेने दिलेल्या जबाबचाही उल्लेख करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT