सचिन वाझेंना नोकरीवरून काढून टाकावं, ख्वाजा युनुसच्या आईची मागणी

मुंबई तक

• 02:49 PM • 15 Mar 2021

माझ्या मुलाला म्हणजेच ख्वाजा युनुसला अजूनही न्याय मिळाला नाही. त्याचा मृत्यू होऊन इतकी वर्षे होऊन गेली तरीही त्याला न्याय मिळू शकलेला नाही असा प्रश्न आता ख्वाजा युनुसची आई आसिया बेगम यांनी सरकारला विचारला आहे. एवढंच नाही तर सचिन वाझे यांना नोकरीवरून काढून टाकण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. सचिन वाझेंना नोकरीवरून हटवण्यात यावं त्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

माझ्या मुलाला म्हणजेच ख्वाजा युनुसला अजूनही न्याय मिळाला नाही. त्याचा मृत्यू होऊन इतकी वर्षे होऊन गेली तरीही त्याला न्याय मिळू शकलेला नाही असा प्रश्न आता ख्वाजा युनुसची आई आसिया बेगम यांनी सरकारला विचारला आहे. एवढंच नाही तर सचिन वाझे यांना नोकरीवरून काढून टाकण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हे वाचलं का?

सचिन वाझेंना नोकरीवरून हटवण्यात यावं त्यानंतर त्यांची चौकशी करण्या यावी त्यातून त्यांनी माझ्या मुलाप्रमाणेच अजून किती जणांवर अन्याय केला आहे ते सत्य समोर येईल असंही आसिया बेगम यांनी म्हटलंल आहे. सरकार आणि न्याय व्यवस्था यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलासोबत घडलं ते इतर कुणासोबतही घडू नये यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे असंही आसिया यांनी म्हटलं आहे.

16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?

काय आहे ख्वाजा युनुस प्रकरण?

२ डिसेंबर २००२ ला मुंबई झालेल्या घाटकोपर बॉम्ब स्फोट प्रकरणात परभणी येथील इंजिनिअर असलेला ख्वाजा युनुस याला अटक केली होती

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपासासाठी मुंबईहून औरंगाबाद कडे येत असताना लोणावळा घाटात ७ जानेवारी २००३ ला ख्वाजा युनुस पळून गेला असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते .

२००३ ला ख्वाजा युनुस च्या परिवाराने ख्वाजा पळाला नाही त्याचा इन्काऊंटर झाला असल्याचा आरोप करत हायकोर्टात रीट (याचिका) दाखल केली .

त्याच वर्षी ख्वाजा युनुसच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात आला .

सचिन वाझेने माझ्या मुलाचा एन्काउंटर करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असा आरोप आसिया बेगम यांनी केला आहे.

सचिन वाझे अडचणीत आलेलं ख्वाजा युनूस प्रकरण नेमकं आहे तरी काय?

युनुसच्या सोबत असणाऱ्या सहआरोपींनी कोर्टात असं म्हटलं की, ‘युनूसला पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या तोंडातून प्रचंड रक्त वाहत होतं आणि त्यानंतर तो आम्हाला काही दिसला नाही.’

तसंच ख्वाजाच्या नातेवाईकांनी देखील पोलिसांवर आरोप केला होता की, ख्वाजा युनूस याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. पण त्याच्या हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी पोलिसांनी तो फरार झाल्याचा बनाव रचला.

याचप्रकरणी युनूसच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सीआयडीकडे सोपवला. यावेळी चौकशीत असं समोर आलं की, पोलिसांच्या ताब्यात असतानाच युनूसचा मृत्यू झाला. त्यामुळे सचिन वाझे आणि तीन इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या आणि पुरावे लपवण्याचा आरोप करण्यात आला.

2004 मध्ये सचिन वाझे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. दुसरीकडे 2007 मध्ये वाझेंनी आपल्या पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामादेखील दिला. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.

    follow whatsapp