Saif Ali Khan Case : रेल्वेने पळून गेला आरोपी? पोलिसांकडून तपासले जातायत लोकल आणि एक्सप्रेसमधले CCTV

संशयिताचा एक नवीन मुंबई पोलिसांना फोटो मिळाला आहे. लोकल रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसल्याची शक्यता आहे.आरोपी वारंवार कपडे बदलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

18 Jan 2025 (अपडेटेड: 18 Jan 2025, 11:24 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईतून फरार?

point

वांद्रे पोलीस स्थानकावरील सीसीटीव्हीची तपासणी

point

पोलिसांना नेमकं काय काय सापडलं?

Saif Ali Khan :अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला 48 तास उलटूनही आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांना अद्याप हल्लेखोराला अटक करण्यात यश आलेलं नाही. घटनेनंतर लगेचच आरोपींनी वांद्रे रेल्वे स्थानकावरून लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेन पकडली, असा पोलिसांचा अंदाज आहे. तो एकतर मुंबई सोडून गेला आहे किंवा आजूबाजूच्या परिसरात लपून बसला असेल असा पोलिसांचा अंदाज आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Satara Crime News : शेतात आढळला धड नसलेला मृतदेह, साताऱ्यात खळबळ, काळ्या जादूचं प्रकरण?

मुंबई पोलिसांना संशयिताचा एक नवीन फोटो मिळाला आहे. लोकल रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसल्याची शक्यता आहे.आरोपी वारंवार कपडे बदलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यावरून असा अंदाज लावला जातोय की, तो एखाद्या गुन्हेगारी वेब सिरीज किंवा चित्रपटाने प्रभावित झालेला असावा. तसंच तो सराईत गुन्हेगार नाही असाही अंदाज पोलिसांना आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. तसंच त्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल कोणतीही माहिती गोळा करता आलेली नाही.

मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 35 पथकं आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आणि एक्सप्रेस ट्रेन रेल्वे स्टेशन CCTV फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात गेला आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : "सैफ हल्लेखोराला भिडला म्हणून जहांगीर...", करीना कपूरचा वांद्रे पोलिसांना जबाब

दरम्यान, 12 जानेवारी रोजी वर्सोवा परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणातील आरोपी शाहिदचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत कोणताही थेट पुरावा सापडला नसला तरी, पोलिसांनी शाहिदला क्लीन चिट दिलेली नाही. पोलीस आता वर्सोवा सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी करत आहेत. 

    follow whatsapp