Saif Ali Khan Stabbed:सैफ अली खानवर घरात घुसून रात्री 2 वाजला हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. चोर घरात घुसल्यानंतर त्याची नोकरांशी झटापट सुरू होती. यावेळी सैफ तिथे पोहोचला आणि त्यानं स्वत: चोराशी दोन हात केले. यावेळी त्याच्याही अंगावर सहा वार करण्यात आले असून, त्यातले दोन वार खोल आहेत. त्यामुळे असा प्रश्न पडतोय की, ही चोरीची घटना आहे की, दुसरा काही प्रकार. यावर सैफच्या टीमने अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मोठी कारवाई सुरू, फडणवीसांनी फास आवळला.. आरोपींचा बाजार उठणार?
अभिनेता सैफ अली खानच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, "सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन करतो. पोलीस केस झाली असून, आम्ही तुम्हाला परिस्थितीबद्दल अपडेट देत राहू."
हल्ला झाला तेव्हा इतर सदस्य कुठे होते?
हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करीना कपूर, मैत्रीण रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. तिघींनीही एकत्र जेवण केलं. करीनाने तिच्या अकाउंटवरुन बहीण करिश्माची ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. तसंच, सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना तिच्या गर्ल गँगसोबत होती की, घरी पोहोचली होती याबद्दल कोणतीही माहिती नाही.
हे ही वाचा >>मकोका लागला अन् वाल्मिक कराडचे दिवस फिरले, 'तो' फ्लॅटच केला सील!
करिश्मा कपूरची पोस्ट
सैफ अली खानवरील या हल्ल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. या संपूर्ण प्रकरणावर कपूर आणि पटौदी कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चाहते सैफ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
ADVERTISEMENT
