अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी आणि अभिनेत्री अशलेल्या करीनाने आपला जबाब नोंदवला. वांद्रे पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला. करीनाने तिच्या जबाबात सांगितलं की, जेव्हा हल्ला झाला तेव्हा मुलांना आणि महिलांना 12 व्या मजल्यावर पाठवण्यात आलं. तेव्हा सैफने महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सैफ हल्लेखोराला भिडला, त्यामुळे हल्लेखोर जहांगीरपर्यंत पोहोचू शकला नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Anjali Damania : DCC बँक घोटाळ्यात उज्ज्वल निकमांच्या मुलाकडूनच मुंडेंची वकिली? दमानियांचा दावा काय?
करीनाने आपल्या जबाबात असंही सांगितलं की, हल्लेखोराने घरातून काहीही चोरलं नाही, पण तो भयंकर आक्रमक होता. त्याने सैफला अनेकदा भोसकलं. हल्ल्यानंतर मी घाबरलेली असल्यानं करिश्माने मला तिच्या घरी नेलं असं करीनाने सांगितलं आहे.
दरम्यान, 15 जानेवारीला बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोर घुसला. सैफच्या मुलांना सांभाळणाऱ्या बाईने चोराला घरात पाहिलं आणि तिने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. हाच आरडाओरडा ऐकून सैफ अली खान हा झोपेतून जागा झाला आणि त्याने आवाजाच्या दिशेने तात्काळ धाव घेतली. यावेळी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने चोराशी झटापट केली. पण यावेळी चोरट्याने सैफवर थेट चाकूने हल्ला चढवला आणि एकामागून एक तब्बल सहा वार केले.
हे ही वाचा >> Solapur Truck Accident : आईसोबत ट्यूशनला निघालेल्या चिमुकलीला ट्रकने चिरडलं, सोलापुरात संताप
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदविरुद्ध घरफोडीचे 4-5 गुन्हे आधीच दाखल आहेत. तथापि, शाहिद हाच सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती आहे की नाही याची पुष्टी अद्याप तरी पोलिसांनी केलेली नाही. सध्या पोलीस शाहिदला संशयित मानून त्याची चौकशी करत आहेत.
सैफच्या मणक्यातून काढला चाकूचा तुकडा
चाकूने झालेल्या 6 जखमांपैकी 2 जखमा या खूप खोल होत्या. या दोन्ही जखमा पाठीच्या आणि मानेजवळ आहेत. सैफच्या मणक्यावर वार केल्यानंतर चाकूचा 2.5 इंचाचा भाग तुटला आणि तो मणक्याजवळच अडकून राहिला. असे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हा तुकडा मणक्याजवळून तात्काळ काढून टाकला.
ADVERTISEMENT
