रक्ताने माखलेल्या सैफला मदत करणाऱ्या ऑटो ड्रायव्हरला पुन्हा एकदा थेट सैफला भेटता आलं. 16 जानेवारीच्या रात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफला ऑटोने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी ड्रायव्हर नव्हता. त्यावेळी ऑटो चालकच मदतीला धावला होता. आता त्या रिक्षा चालकाला सैफने भेटायला बोलावल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
सैफ अली खानवर हल्ला झाला, त्यादिवशी 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानने ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणाला भेटले होते. हाच भजनसिंह सैफला आपल्या रिक्षातून लीलावती रुग्णालयात घेऊन गेला होता. रुग्णालयात शर्मिला टागोरशीही त्यांनी भेट घेतली. ही एक छोटीशी भेट होती, पण या भेटील सैफ अली खानने त्याचे आभार मानले. शर्मिला टागोर यांनी त्याला आशीर्वाद दिले. तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हणत सैफने ऑटो चालकाला मिठी मारली चांगले काम केले आहे, सैफने त्याला मिठी मारली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी ही भेट झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा >> Krishna Andhale Wanted : कृष्णा आंधळे फरार घोषित, बीड पोलिसांनी जाहीर केलं प्रसिद्धी पत्रक
दरम्यान, त्या दिवशी रात्री ऑटो चालकाला फार उशिरा कळलं की, ऑटोमध्ये बसलेला जखमी व्यक्ती बॉलीवूड स्टार सैफ अली खान आहे. पण ऑटो चालकाला आता त्याच्या चांगल्या कर्माचं फळ मिळालं आहे. ऑटो चालक भजन सिंगला एका संस्थेनं 11 हजार बक्षीसही दिलं होतं. भजन सिंगचं चांगलं काम पाहून एका संस्थेनं त्यांचं कौतुक केलं होतं. बक्षीस देतानाचा फोटोही समोर आला होता.
हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी
ड्रायव्हरने सांगितलं, की तो त्या रात्री रात्रीच्या काम करत होता. त्यानं सैफला इमारतीच्या गेटबाहेरून ऑटोमध्ये बसवलं.ऑटो चालकानं अगदी कमी वेळेत सैफला लिलावती रुग्णालयात पोहोचवलं. कोट्यवधींचा मालक असलेल्या सैफसाठी या रिक्षाचालकाचं वेळेवर धावून येणं महत्वाचं ठरलं होतं.
ADVERTISEMENT
