अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा, तसंच नुकताच पार पडलेला विकी आणि कतरिना यांचा विवाह सोहळा यानंतर चर्चेत आहे ते राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न. जयपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडतो आहे. या लग्नात राजकीय नेत्यांसोबतच सेलिब्रिटींचीही उपस्थिती आहे. बॉलिवूडमधले अनेक दिग्गज नेते या लग्नात सहभागी झाले आहेत.
ADVERTISEMENT
शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबासह लग्नासाठी हजर राहिली. तसंच सलमान खानही या लग्नात आला. या लग्नातला एक डान्स व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. हा डान्स व्हीडिओ आहे सल्लूभायच्या सिनेमातील गाण्याचा. शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, आणि सलमान हे तिघेही जुम्मे की रात है… या गाण्यावर थिरकतानाचा हा व्हीडिओ आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नातला हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सलमान खान, अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी स्टेजवर प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाला भेटायला गेले आहेत. त्यानंतर या गाण्यावर तिघेही नाचत आहेत. सलमान नेमक्या कशा स्टेप्स करायच्या हे देखील समजावून सांगतो आहे. हा व्हीडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय हा सलमान खानचा फॅन आहे. त्यामुळे सलमान खानला या लग्नात बोलवण्यात आलं. सलमानला निमंत्रण गेल्यापासूनच तो येईल का? याची उत्सुकता प्रजयला होती. तो आल्यानंतर आणि डान्स केल्यानंतर आता प्रजयला आस्मान ठेंगणं झालं आहे.
या शाही लग्नात शिवसेना नेते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेज लिमिटेडचे संस्थापक अनिल अग्रवाल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, जया बच्चन, डॉक्टर केतन देसाई आणि भाजपचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहिले असंही दिसून आलं आहे. मात्र चर्चा होते आहे ती या व्हीडिओची आणि सलमान, शिल्पा आणि अनिल कपूर या तिघांनी जो ठेका धरला त्याची.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जया बच्चन, प्रफुल पटेल यांचे बंधू अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजप नेते राजीव प्रताप रुडी देखील समारंभात सहभागी झाले होते. जयपूर विमानतळावर यानिमित्त तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ADVERTISEMENT