Radhe Review: सलमान खानच्या राधे सिनेमावर शिटी मारावीशीच वाटत नाही

मुंबई तक

• 11:05 AM • 13 May 2021

ईद आणि भाईजानचा सिनेमा हे कित्येक वर्षापासूनचं समीकरण आहे. आणि हे समीकरण या ही वर्षी भाईजानने अर्थात सलमान खानने जुळवून आणलं आहे.या समीकरणाचं नाव आहे .. राधे … कारण भाईजान काय म्हणतो एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की नही सुनता…तर हा राधे सिनेमा कसा आहे ह्याची तुम्हांला उत्सुकता असेलच […]

Mumbaitak
follow google news

ईद आणि भाईजानचा सिनेमा हे कित्येक वर्षापासूनचं समीकरण आहे. आणि हे समीकरण या ही वर्षी भाईजानने अर्थात सलमान खानने जुळवून आणलं आहे.या समीकरणाचं नाव आहे .. राधे … कारण भाईजान काय म्हणतो एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की नही सुनता…तर हा राधे सिनेमा कसा आहे ह्याची तुम्हांला उत्सुकता असेलच तर यावर एक नजर टाकूया…

हे वाचलं का?

तर एक आटपाट महानगर असतं ,या महानगराचं नाव असतं मुंबई.. या मुंबईत काय होत असतं माहित्ये.. सगळीकडे ड्रग्सचा एवढा सप्लाय होत असतो की त्यामुळे या आटपाट नगरातली तरूण पिढी अक्षरक्ष बरबाद होत असते. या ड्रग्स सप्लाय करणाऱ्या महान मंडळींना पकडणं अब पुलिस के बस के भी बाद राहत नाही.. मग काय होतं. मग असं होतं. की नेहमीप्रमाणे पोलिस सेवेतून सस्पेंड केलेला राधे नावाचा जाबांज पोलिस अधिकाऱ्याला या ड्रग्सपासून मुंबईला वाचवण्यासाठी पुन्हा पोलिस सेवेत आणलं जातं. आणि हा हँडसम,डँशिंग, सिक्स पँकवाला राधे मुंबईत पसरलेले ड्रग्ज रँकेट मुळापासून उखडून टाकतो. आणि मुंबई ड्रग्ज रँकेटमधून मुक्त होते… गोष्ट संपली…

बरं या गोष्टीत मध्ये मध्ये राधेची गर्लफ्रेंड येते तिच्यासोबत गाणं,डान्स होतो. राधेचे सिनिअर असलेले पोलिस अधिकारी अविनाश अभ्यंकर अर्थात जँकी श्रॉफ यांच्यासोबत राधेचे खूप खूप हसवणारे विनोदी सीन असतात.. राधेचे ४ ते ५ सणसणीत टाळ्या ठोकणारे वन लाईनर येतात.. राधेचे जबरदस्त स्टंट, खूप सारी हाणामारी, गाड्यांची उडवाउडव, असं सगळं असतंच..मुळात भाईजानच्या सिनेमात जे असायला हवं तो सगळा मसाला या ही सिनेमात बरकरार आहे हा.. बाकी गोष्ट वगैरे असं काही नसतं हो.. हा भाईजानचा सिनेमा आहे त्यामुळे डोकं बाजूला ठेवायचं आणि सिनेमा एन्जाँय करायचा. आणि मुळात या सिनेमाचा दिग्दर्शकही प्रभूदेवा आहे आता प्रभूदेवा आणि भाईजान एकत्र आल्यावर जे जे काही होऊ शकतं ते सगळं या सिनेमात आहे. एकच २ मिनिटं दिलासा देण्याची गोष्ट म्हणजे याच जोडगोळीच्या दबंग ३ पेक्षा राधे जरा तरी उजवा आहे..

बाकी अभिनयाचं म्हणाल तर भाईजान नेहमी आपल्या पोतडीतून जे जे काही देतात ते ते त्यांनी इथेही उधळवून टाकलं आहे. दिशा पटानीची या सिनेमात अभिनयापेक्षा दशाच जास्त झाली आहे. राणाच्या भूमिकेतील रणदीप हुडा आपल्याला दिलेलं काम अतिशय चापून चोपून करतो. जँकी श्रॉफमुळे थोड्यावेळ का होईना सिनेमा सुखावह वाटतो.. आपल्याला एकच गोष्टीचा आनंद काय आहे ना भाऊ आपले मराठमोळे दोन खंदे अभिनेते सिध्दार्थ जाधव आणि प्रवीण तरडे यांनी आपल्याला दिलेली भूमिका अतिशय चोख केलेली आहे…तेव्हा राधे हा एक मसाला सिनेमा आहे. लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी बसला असाल तर घटकाभर का होईना मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्ही भाईजानचे डायहार्ट फॅन असाल तर एकदा पाहण्यासारखा आहे. बाकी लॉजिक,कथा असं मुळातच काही नाहीये यात… तेव्हा भाईजान खूप काही म्हणत असेल हो सिटी मार सिटी मार पण राधे पाहून तुम्हांला सिटी मार वाटेलच असं तरी वाटत नाही….

    follow whatsapp