Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणासाठी संभाजी महाराज यांनी खासदारकीला लाथ मारावी’

मुंबई तक

• 02:57 PM • 12 Jul 2021

गणेश जाधव, उस्मानाबाद ‘छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) भाजपच्या खासदारकीला (BJP MP) लाथ मारावी, त्यांनी खासदरकीचा राजीनामा द्यावा.’ असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Ex MLA Harshvardhan Jadhav) यांनी व्यक्त केलं आहे. ते उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘खासदार-आमदारपेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे […]

Mumbaitak
follow google news

गणेश जाधव, उस्मानाबाद

हे वाचलं का?

‘छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) भाजपच्या खासदारकीला (BJP MP) लाथ मारावी, त्यांनी खासदरकीचा राजीनामा द्यावा.’ असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Ex MLA Harshvardhan Jadhav) यांनी व्यक्त केलं आहे. ते उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

‘खासदार-आमदारपेक्षा महाराजांची गादी ही कित्येक पटीने श्रेष्ठ व मोठी आहे. मराठा समाजाचे आंदोलन करताना भाजपमध्ये राहून दुटप्पी भूमिका घेणे अयोग्य आहे.’ अशी टीकाही हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, आम्ही तुमच्यासोबत येऊ. असे म्हणत संभाजी महाराजांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. हर्षवर्धन जाधव घटना दुरुस्तीसाठी दिल्लीत 9 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.

‘मराठा आरक्षणबाबत संभाजी महाराज यांची भूमिका अनेकांना कळली नाही. घटनादुरुस्ती करावी यासाठी त्यांनी भाजपला त्यांच्या पक्षाचे खासदार म्हणून तयार करावे. मदत नाही केली तर अशा पक्षाचा खासदार राहण्यात काय अर्थ आहे.’

‘एकीकडे त्या पक्षाचे खासदार म्हणून फिरायचे व दुसरीकडे  मराठा आरक्षणासाठी लढतोय हे दाखवायचे हे विरोधाभास करणारे आहे. ज्या पद्धतीने मी मराठा आरक्षणसाठी आमदारकीचा राजीनामा दिला त्याच प्रकारे त्यांनी खासदरकीचा राजीनामा द्यावा, एवढंच नव्हे तर त्याला लाथ मारावी. महाराज जी छत्रपतीची गादी चालवत आहेत त्यासमोर आमदार-खासदार काय आहे.’ असंही हर्षवर्धन जाधव यावेळी म्हणाले.

‘मी 9 तारखेला दिल्ली येथे जंतरमंतर येथे मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणार आहे. मराठा समाजाला भाजपने 2 वेळेस फसविले आहे. त्यामुळे संभाजी महाराज यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि दिल्ली येथील आंदोलनात सहभागी झाल्यास त्या आंदोलनाला चार चाँद लागतील.’

OBC Reservation: ‘संभाजी महाराजांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातील आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर…’

‘छत्रपतीची गादी ही राजकारणापेक्षा मोठी आहे, छत्रपतीचे वंशज होण्यासाठी फार मोठे नशीब लागते. ते संभाजी महाराज यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधीच्या गादीला लाथ मारून छत्रपतीच्या गादीचे श्रेष्ठत्व ठेवावे. त्यांनी राजीनामा दिल्यास आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत.’ असे जाधव म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून संभाजी महाराजांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. या माध्यमातून त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.

    follow whatsapp