तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत सहा वेगवेगळे लॅपटॉप्स आणले आहेत. हे लॅपटॉप्स कंपनीने मागील महिन्यात बार्सिलोना येथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लॉन्च केले होते.
ADVERTISEMENT
भारतातील लॅपटॉप्स मार्केटपासून सॅमसंग बराच काळ दूर होती. त्यानंतर कंपनीने वेगवेगळ्या श्रेणीतील ६ लॅपटॉप्स लॉन्च केली आहेत. यामध्ये गॅलक्सी बुक-२ ३६० (Galaxy Book 2 360), गॅलक्सी बुक २ प्रो ३६० (Galaxy Book 2 Pro 360), गॅलक्सी बुक २ बिझनेस (Galaxy Book 2 Business) आणि गॅलक्सी बुक गो (Galaxy Book Go) या लॅपटॉप्सचा समावेश आहे.
सहा वेगवेगळ्या श्रेणीतील लॅपटॉप्समध्ये सगळ्यात स्वस्त गॅलक्सी बुक गो (Galaxy Book Go) लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल नाही, तर Qualcomm Snapdragon 7c Gen 2 चिपसेट दिलेला आहे. Qualcomm बद्दल बऱ्याच जणांना कल्पना आहे. Qualcomm बहुतांश करून मोबाईल प्रोसेसर बनवते.
या लॅपटॉप्समध्ये सर्वात कमी किमतीचा लॅपटॉप ३८ हजार ९९० रुपयांचा आहे. कंपनीने खरेदीवर कॅशबॅक ऑफरचीही घोषणा केलेली आहे. लॅटटॉप खरेदी केल्यास तुम्ही ३ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.
गॅलक्सी बुक २ ३६० ची (Galaxy Book 2 360) किंमत ९९ हजार ९९० रुपये इतकी आहे. तर गॅलक्सी बुक २ प्रो ३६० ची (Galaxy Book 2 Pro 360) किंमत १ लाख ६ हजार ९९० रुपयांपासून सुरू होते. गॅलक्सी बुक २ बिझनेस (Galaxy Book 2 Business) ची किंमत १ लाख ४ हजार ९९० रुपये इतकी आहे. या लॅपटॉप्समध्ये इंटेलची १२ जनरेशनचा चिपसेट आहे.
सॅमसंगने या लॅपटॉप्समध्ये गॅलक्सीचे अनेक सॉफ्टवेअर्स आणि अॅप्स दिलेले आहेत. यामध्ये क्विक शेअर, लिंक शेअरिंग, सॅमसंग गॅलरी, सॅमसंग नोटस् आणि सेंकड स्क्रीन आदी फिचर्सचा समावेश आहे. अनेक वर्षानंतर सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत सहा लॅपटॉप्स लॉन्च केले आहेत.
सॅमसंगच्या लॅपटॉप्सला भारतीय बाजारपेठेत कसा प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचं असणार आहे. लॅपटॉप्स मार्केटमध्ये सध्यातरी तीव्र स्पर्धा असून, सॅमसंगचे लॅपटॉप्स ग्राहकांच्या किती पसंतीस उतरतात, हे पुढच्या काळात दिसून येईल.
ADVERTISEMENT