“मुख्यमंत्री ‘भुमरे साहेबांकडे’ जा”; अर्जून खोतकरांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

मुंबई तक

24 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:49 AM)

धनंजय साबळे, प्रतिनिधी अकोला: अकोल्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका करण्यात आली आहे. अकोल्यातील शिंदे गटाच्या ‘हिंदू गर्वगर्जना मेळाव्या’त मंत्री संदिपान भूमरे आणि अर्जून खोतकरांनी भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी अर्जून खोतकरांनी मंत्री संदिपान भुमरेंच्या उल्लेख थेट मुख्यमंत्री म्हणून केला आहे. अर्जून खोतकर काय म्हणाले? अकोल्यातील हिंदू गर्वगर्जना यात्रेत भाषण करत […]

Mumbaitak
follow google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी

हे वाचलं का?

अकोला: अकोल्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका करण्यात आली आहे. अकोल्यातील शिंदे गटाच्या ‘हिंदू गर्वगर्जना मेळाव्या’त मंत्री संदिपान भूमरे आणि अर्जून खोतकरांनी भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी अर्जून खोतकरांनी मंत्री संदिपान भुमरेंच्या उल्लेख थेट मुख्यमंत्री म्हणून केला आहे.

अर्जून खोतकर काय म्हणाले?

अकोल्यातील हिंदू गर्वगर्जना यात्रेत भाषण करत असताना बोलण्याच्या ओघात अर्जून खोतकरांकडून संदिपान भूमरेंचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. “तुम्ही कामं घेऊन मुख्यमंत्री ‘भूमरे साहेबांकडे’ जा, ते तूमचे कामं करतील”, असं वक्तव्य खोतकरांनी केल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायची ईच्छा तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती. मात्र, ‘मातोश्री’वरील काही लोकांनी सात दिवस दिवस हा निरोपच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू दिला नाही अशी खंतही खोतकरांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

संदिपान भूमरेंची उद्धव ठाकरेंवरती टीका

हिंदू गर्वगर्जनेच्या सभेत संदिपान भूमरेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. यावेळी त्यांनी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ”ठाण्यावरून सुरतकडे जात असतांना गाडीत एकनाथ शिंदे, आपण, अब्दूल सत्तार आणि नितीन देशमुख होतो. यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा अशी गळ देशमुखांनी एकनाथ शिंदेंना घातल्याचा भुमरेंनी गौप्यस्फोट केला आहे.

पुढे भुमरे म्हणाले ”उद्धव ठाकरे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनाही भेटत नव्हते. आम्हाला लाजेखातर ते भेटतात असं खोटं बोलावं लागत होतं. गद्दार आम्ही नाही तर युतीच्या नावावर मतं घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्ही, जनता आम्हाला जाब विचारायची.”

    follow whatsapp