शरद पवारांना खुर्ची देण्यावरून भाजप नेत्यांकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानांवर आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या नेत्या दीप्ती रावत यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. महिलांबद्दल अवमानजनक विधान केल्याचा आरोप रावत यांनी केला असून, दिल्लीतील मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केली घातपाताची शंका
काय आहे प्रकरण?
9 डिसेंबर रोजी संजय राऊत यांनी दोन वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांबद्दल बोलताना आपत्तीजनक शब्द वापरला होता. संजय राऊतांनी मुलाखती दरम्यान वापरलेल्या विधानावर आक्षेप घेत रावत यांनी 9 डिसेंबर रोजीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्याविरुद्ध महिलांचा अवमान केल्याप्रकरणी आणि स्त्रियांबद्दल सार्वजनिक ठिकाणी अपशब्द वापरल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शरद पवारांना मी खुर्ची दिली यामध्ये कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय?-संजय राऊत
संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांबरोबर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांबद्दलही अपमानकारक शब्द वापरल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती रावत-भारद्वाज यांनी पोलिसांत तक्रार करताना संजय राऊत यांच्या संबंधित व्हिडीओ क्लिप्सही पोलिसांकडे दिले आहेत.
ADVERTISEMENT