ADVERTISEMENT
महाराष्ट्रात झालेल्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप होत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रीती भोजनासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना निमंत्रण दिलं होतं,
या प्रीती भोजनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. भाजपचे खासदारही या प्रीती भोजनासाठी आले होते.
महिला खासदारांशी चर्चा करत असताना संजय राऊत
संजय राऊत यांनी डिनर डिप्लोमसी चांगलीच चर्चेत
भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्याशी चर्चा करताना संजय राऊत
शरद पवारांची या प्रीती भोजन कार्यक्रमाला असलेली उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती
गायिका मैथिली ठाकूर यांच्या गाण्याचा कार्यक्रमही संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता
प्रीती भोजनासाठी जमलेल्या पाहुण्यांसोबत शरद पवार
महाराष्ट्रात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर झालेल्या या प्रीती भोजनाची चांगलीच चर्चा
प्रीती भोजन कार्यक्रमाची जय्यत तयारी यावेळी करण्यात आली होती
ADVERTISEMENT