शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपबद्दलची भूमिका गेल्या काही दिवसांपासून काहीशी मवाळ झाल्याचं दिसतंय. अशातच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास मध्ये खळबळ उडाली आहे. भाजप सोबत जाण्याबद्दलच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजपच्या अनेक लोकांना आमच्यासोबत युती करण्याची इच्छा असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एका लग्न समारंभात भेटले होते. या भेटीनंतरच संजय राऊत यांचं विधान आले. राऊत म्हणाले, 'चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. ते नेहमीच भाजप-शिवसेना युतीचे समर्थक राहिले आहेत. आता भाजपमध्ये अनेक बाहेरचे लोक आले आहेत, ज्यांना आपल्या (भाजप-शिवसेना) 25 वर्षांच्या युतीचं महत्त्व माहित नाही. अशा लोकांचा भाजप किंवा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही.
संजय राऊत पुढे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांच्या ज्या भावना आहेत, त्याच भाजपमधील इतर अनेकांच्याही भावना आहेत. मी त्यांच्या विचारांचं कौतुक करतो. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्याचं कारणही भाजपमधील काही लोकच होते. आमची मूळ शिवसेना सोडून तयार झालेल्या नवीन 'डुप्लिकेट शिवसेनेला' भाजपने पूर्ण पाठिंबा दिला आहे. आमचा जो अधिकार होता तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला.
हे ही वाचा >>Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल, भगवानगड त्यांच्या पाठीशी : महंत नामदेव शास्त्री
संजय राऊत यांना भाजप आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यातील संभाव्य युतीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासारखे विचार करणारे अनेक लोक आहेत. आम्ही यावर सतत चर्चा करत आहोत. पण सध्या आपण 'वेट अँड वॉच' या भूमिकेत आहोत. तसंच, पुढे काय होणार आहे हे आपल्याला आधीच माहित आहे. एकनाथ शिंदे किती काळ भाजपसोबत राहू शकतील याबद्दल मला शंका आहे. ते फक्त सत्ता आणि पैशाच्या बळावरच टिकून आहेत असं राऊथ म्हणाले.
"अनेकांना दोन्ही पक्षांना एकत्र पहायचे आहे"
हे ही वाचा >>Nana Patole : "बीडमध्ये तर एकच वाल्मिक कराड पण पुण्यात...",DPDC मिटिंगनंतर नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संजय राऊत यांनी युतीबाबत शिवसेनेतील नेत्यांच्या इच्छेबद्दलही सांगितलं. राऊत म्हणाले, 'युतीबाबत आमच्यात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पण अनेक भाजप नेत्यांना दोन्ही पक्षांना एकत्र आलेलं पाहायचं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या भावना पक्षातील अनेक लोकांच्या भावना आहेत. कारण आम्ही त्यांच्यासोबत (BJP) 25 वर्ष चांगलं काम केलं आहे.
ADVERTISEMENT
