शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा लोक म्हणत होते मुंबई-ठाण्याच्या पुढे शिवसेना जाणार नाही. एवढंच काय पाच सहा महिन्यांमध्ये शिवसेना बंद पडेल. पण शिवसेना बंद पडली नाही, शिवसेना महाराष्ट्रात तर पसरलीच पण राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंतही पोहचली असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या स्थापना दिवशीच शिवसेनेबाबतची आठवण सांगितली आहे. आजही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसेना पुढे जाते आहे.
ADVERTISEMENT
मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपले वाटते हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत आज हिंदुत्व म्हटलं की शिवसेनाच लोकांना आठवते. देशाच्या दृष्टीने आपला विचार आपली भूमिका राहील आणि लोकांचे प्रश्न सोडवावेत भविष्यात आज पेक्षाही जास्त प्रखरतेने शिवसेना राष्ट्रीय राजकारणात दिसेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना हा देशाच्या राजकारणातला मोठा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. “देशाच्या राजकारणात शिवसेना हा खूप मोठा चमत्कार आहे. इथल्या मराठी लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. सगळे म्हणत होते की मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा लोकं म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत. आज घडीलाही दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही शिवसेनेची भूमिका आहे. उद्याही अशीच भूमिका असणार आहे असंही राऊत यांनी सांगितलं.
मराठी माणसाचा विषय शिवसेनेने दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाबाबत त्यांना विचारलं असता त्यांच्याकडून काँग्रेस पक्षबांधणीचं काम वेगाने होवो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT