Santosh Deshmukh Case : "तपासाबद्दल काहीच माहिती नाही...", संतोष देशमुखांच्या लेकीचा यंत्रणांना सवाल 

वैभवी म्हणाली, "माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याला आता महिना उलटला. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करतंय, पण तपास कुठपर्यंत आला, कोणत्या पद्धतीनं तपास केला जातोय याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही.

Mumbai Tak

सुधीर काकडे

11 Jan 2025 (अपडेटेड: 11 Jan 2025, 01:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांच्या लेकीचा यंत्रणांना सवाल

point

प्रकरणाचा तपास कुठवर आला हे का सांगतिलं जात नाहीये?

point

पोलिसांकडून का गुप्त ठेवली जातेय तपासाबद्दलची माहिती?

Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज महिना उलटला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात या प्रकरणामुळे वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. एकीकडे मोर्चे काढले जातायत, दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबी टाहो फोडतायत तर या प्रकरणाचा तपास कुठवर आला हे कुणालाच माहिती नाहीये. याच मुद्द्याला धरून संतोष देशमुखांची लेक वैभवी देशमुख हीने यंत्रणांच्या तपासाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 

हे वाचलं का?


हे ही वाचा >>What is Mcoca Act : मकोका कायदा नेमका काय? संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्याची का होतेय मागणी? 

 

वैभवी म्हणाली, "माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याला आता महिना उलटला. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करतंय, पण तपास कुठपर्यंत आला, कोणत्या पद्धतीनं तपास केला जातोय याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. एक आरोपी अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडलाय की, तपास आमच्यापासून का लपवला जातोय. या केसमध्ये काय चाललंय हे देशमुख कुटुंबीयालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. त्यामुळे या केसच्या तपासाबद्दल आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावं"

हे ही वाचा >>Jitendra Awhad: "कलेक्टरची, एसपीची पहिली चौकशी सुरु करा...", परळी विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरून जितेंद्र आव्हाड संतापले

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला आणि थेट 31 दिवसांनी या प्रकरणाशी आणि खंडणी प्रकरणाशी संबंधीत आरोपी वाल्मिक कराड हा स्वत: आपल्या गाडीतून पोलिसांसमोर हजर झाला. त्यामुळे पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचंही बोललं गेलं. त्यानंतर आता स्वत: देशमुख कुटुंबाकडूनच या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. 

दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने सहा आरोपींना अटक केलीय. यापैकी आरोपी विष्णू चाटेला आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयाने विष्णे चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सीआयडीने नवीन खुलासे उघड केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp