बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना उलटला. याप्रकरणात वेगवेगळ्या पातळ्यांवर सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. सोबतच आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीचा मुद्दाही आहे. एकामागून एक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येतंय आणि या संपूर्ण प्रकरणावर राज्याचं लक्ष लागून आहे. त्यातच काल आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे गैरहजर असल्यानं चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दलच 'मुंबई तक'ने बाळासाहेब कोल्हे यांच्याशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"
विष्णू चाटेला कोर्टात हजर केलं, त्यावेळी कोर्टात का उपस्थित नव्हते असं विचारलं असता सरकारी वकील कोल्हे म्हणाले, पोलिसांनी मला सांगितलं होतं आम्ही न्यायालयीन कोठडी मागणार आहोत. त्यामुळे मी कोर्टामध्ये गैरहजर राहिलो. तसंच या प्रकरणांमध्ये माझ्यावर कुठल्याही पद्धतीचा दबाव नाही. मी कोणाच्या ही दबावाला बळी पडत नाही. 18 जानेवारीला खून प्रकरणातील आरोपींना पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी मी सरकारी पक्षाचा वकील म्हणून बाजू खंबीरपणे मांडणार आहे. मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यामध्येही आरोपींना न्यायालयात हजर करून कारवाई होईल आणि त्यासंदर्भाची देखील मी बाजू कोर्टामध्ये मांडणार आहे.
हे ही वाचा >> Torres Scam Update : टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणात ED ची एन्ट्री... मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची चौकशी सुरू
दरम्यान, विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 35 दिवस उलटून गेले आहेत. या काळात वेगवेगळ्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेण्यात आलं आहे. विष्णू चाटे हा या प्रकरणातला महत्वाचा आरोपी असून, त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की, पोलीस कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
ADVERTISEMENT
