Sarangi Mahajan : "धाक दाखवून कोट्यवधींची जमीन हडपली...", पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यावर सारंगी महाजन यांचे गंभीर आरोप

विशेष म्हणजे यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे असं सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mumbai Tak

सुधीर काकडे

09 Jan 2025 (अपडेटेड: 09 Jan 2025, 09:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भावाच्या पत्नीचे आरोप

point

सारंगी महाजन याप्रकरणी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भेटल्या

point

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या दोघांवरही गंभीर आरोप

Sarangi Mahajan Vs Dhananjay Munde : दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी मुंडे बंधू-भगिनींवर गंभीर आरोप केले आहेत. माझी जमीन धनंजयच्या लोकांनी हडप केली असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे असं सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, हा विषय त्यांच्यासमोर ठेवला आहे. 

हे वाचलं का?

सारंगी महाजन म्हणाल्या, जीरेवाडीमध्ये 242 गटनंबरमध्ये माझी जमीन आहे. धनंजयच्या लोकांनी ती जमीन हडप केली. गोविंद मुंडे या त्यांच्या घरचा नोकर, त्यानेच माझ्याशी संपर्क करुन ही जमीन हडप केली. जोपर्यंत आम्ही रजिस्ट्री करत नाही, तोपर्यंत आम्हाला सोडलं नाही, आमच्याकडून 100 रुपयांच्या  बॉण्ड पेपरवरही सह्या करुन घेतल्या. त्याशिवाय परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला. यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे असं सारंगी महाजन म्हणाल्या. 

हे ही वाचा >> लग्नाची Anniversary अन् पती-पत्नीने दिला जीव, आत्महत्येआधी Video केला शेअर

साडेतीन कोटी रुपयांची जमीन फक्त 21 लाख रुपयांना घेतली, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं तेव्हा मला कळलं. गोविंद मुंडे हे धनंजय मुंडे यांचे घरचे नोकर आहे. पंडितअण्णांची तो सेवा करायचा, नंतर त्याच्या बायकोला नगरसेवक केल्यावर त्याने क्रशर, गाड्या, फार्सहाऊस अशी मोठी माया जमा केली असं सारंगी महाजन म्हणाल्या. त्यानंतर मी दीड वर्ष धनंजयचा फॉलोअप केला, राजा-बेटा-बाबू असं गोड बोलून, तू माझा नातेवाईक आहे म्हणून मी त्याला काम करण्यासाठी विनंती केली. मी परळीत आले की, तो बाहेर निघून जायचा. नंतर त्याचा अपघात झाला, तेव्हा मी तिथे पुन्हा भेटायला गेले  रुग्णालयात. तेव्हा मला धनंजयने सांगितलं, मामी तू घाबरू नको, मी तूझी जमीन मिळवून देतो, मी परळीचा किंग आहे. तेव्हा मला वाटलं की, याचा हात असू शकतो, पण मी म्हटले की, आपला नातेवाईक आहे तर तो काम करुन देईल. 

हे ही वाचा >> Kolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?

एकूणच सारंगी महाजन यांनी हे असे गंभीर आरोप केले असून, वाल्मीकचाही यामध्ये संबंध असू शकतो असं म्हटलं आहे. याप्रकरणी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यांनी आपल्याला हे काम करुन देण्याचं आश्वासनही दिल्याचं सारंगी महाजन म्हटल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात काय अपडेट समोर येतात ते पाहणं महत्वाचं आहे.  


    follow whatsapp