MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

मुंबई तक

02 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:07 AM)

Satyajeet Tambe or Shubhangi Patil who will be Elected: नाशिक: राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) निकाल आज (2 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. काँग्रसे नेते सत्यजीत तांबेंची (Satyajeet Tambe) बंडखोरी आणि शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडींमुळे […]

Mumbaitak
follow google news

Satyajeet Tambe or Shubhangi Patil who will be Elected: नाशिक: राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) निकाल आज (2 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. काँग्रसे नेते सत्यजीत तांबेंची (Satyajeet Tambe) बंडखोरी आणि शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडींमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे नाशिक मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. (satyajeet tambe or shubhangi patil who will be elected maharashtras focus is on nashik graduate constituency mlc election result)

हे वाचलं का?

या निवडणुकीत सत्यजीत तांबे की शुभांगी पाटील नेमकं बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेले असताना मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे. ‘मतमोजणी फक्त फॉर्मालिटी बाकी आहे, विजय आपलाच आहे. आमदार नसताना मी अनेक कामे केले, त्यामुळे जनतेला विश्वास आहे की, ही आमदार झाल्यावर दहा पट जादा काम करेल.’ असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील

तर दुसरीकडे निकालाआधीच सत्यजीत तांबे यांचे आमदार झाल्याचे बॅनर्स नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. यामुळे आता या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मतमोजणी सुरू

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागात 49.28 टक्के मतदान झाले आहे. ज्याची आज मतमोजणी सुरु आहे. सय्यद प्रिंपी येथील निवडणूक शाखेच्या गोदामात आज पाचही जिल्ह्यांची एकत्रित मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, २८ टेबलवर मतमोजणी सुरू केली आहे.

राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागातून 1 लाख 29 हजार 456 पदवीधरांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर आता साऱ्यांचेच लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील गोदामात सकाळी ८ पासून ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी २८ टेबल मांडण्यात आले आहेत.

Shubhangi Patil : ठाकरेंची ताकद मिळताच शुभांगी पाटलांनी फुंकलं रणशिंग!

अशी होणार मतमोजणी

या प्रत्येक टेबलवर एक तहसीलदारासह दोन नायब तहसीलदार नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका एकत्रित करून त्याचे एक-एक हजारांचे गठ‌्ठे करण्यात येतील. त्यानंतर 16 उमेदवार आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येतील.

दरम्यान, अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर उरलेल्या वैध मतपत्रिकांची मोजणी करून त्याद्वारे विजयासाठीचा आवश्यक कोटा निश्चित केला जाईल. मतमोजणीत जो उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमवारीत आवश्यक कोटा पूर्ण करले, त्याला विजयी घोषित करण्यात येणार आहे.

कोटा ठरविण्याचे सूत्र

पदवीधर निवडणुकीत विजयाचा कोटा ठरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक सूत्र घालून दिले आहे. त्यानुसार अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर राहिलेलेल्या वैध मतपत्रिकांतून हा कोटा निश्चित केला जाणार आहे.

सूत्र:

– वैध मतपत्रिका+ 1 भागिले 2 = येणारी संख्या ही विजयी कोटा असेल.

– मतपत्रिकांसाठी 16 उमेदवारांसह अवैध मतपत्रिका असे 17 बॉक्सेस

    follow whatsapp