पिशवीमध्ये महिलेच्या कंबरेखालचा भाग, खोपडी आणि हात.. खुनाची खळबळजनक घटना

मुंबई तक

19 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Murder news : दिल्लीतील सराय काले खां परिसरात खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. दुर्गंधीमुळे लोकांनी पोलिसांना (Delhi Police) माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. (Dead body) मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सापडलेल्या शरीराचे तुकडे संबंधित विभागात पाठवले आहेत. लवकरच मृत […]

Mumbaitak
follow google news

Murder news : दिल्लीतील सराय काले खां परिसरात खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे. दुर्गंधीमुळे लोकांनी पोलिसांना (Delhi Police) माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. (Dead body) मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सापडलेल्या शरीराचे तुकडे संबंधित विभागात पाठवले आहेत. लवकरच मृत व्यक्तीची ओळख पटवून आरोपीला गजाआड करण्यात येईल, असं पोलीस सांगत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. (Sensational incident of murder in Delhi; Carcass pieces in polythene…)

हे वाचलं का?

पोलिसांना पॉलिथिनमध्ये शरीराचे तुकडे सापडले

विशेष म्हणजे, सराये काले खां परिसरातील सनलाईट कॉलनी पोलिसांना दुपारी बाराच्या सुमारास संशयास्पद पॉलिथिन असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पॉलिथिन उघडले असता त्यात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळले.

कवटी, हात आणि हे अवयव पॉलिथिनमध्ये सापडले

पांढऱ्या रंगाच्या या पॉलिथिनमध्ये महिलेची कवटी, कमरेचा खालचा भाग, चिरलेला हात आणि हाताचा पंजा आढळून आला. ही बातमी परिसरात आगीसारखी पसरली.इतक्या वाईट अवस्थेत शरीराचे तुकडे सापडल्यानंर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची चर्चा परिसरात सुरु आहे.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा तपासात गुंतले

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. माहिती मिळताच एफएसएल टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला तैनात करण्यात आले आहेत.

विवाहित प्रेयसीला आधी मंदिरात नेले नंतर तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले

दिल्लीत घड्तायेत क्रूर हत्येच्या घटना

मागच्या काही दिवसांपासून दिल्ली आणि परिसरात अशा हत्येच्या घटना वारंवार समोर येत आहे. गेल्यावर्षी श्रद्धा वाल्कर प्रकरणामुळे दिल्ली हादरली होती. तिच्याच प्रियकर आफ्ताबने तिची क्रूर हत्या करून शरीराचे अनेक तुकडे केले होते आणि ते तुकडे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. अनेक दिवस तिच्या शरीराचे भाग त्याच्या फ्रिजमध्ये होते, असं त्याने स्वतः कबूल केले आहे.

त्यानंतर देखील हत्या करून मृतदृहाचे अनेक तुकडे केल्याच्या क्रूर घटना समोर आल्या आहेत. आता त्यानंतर पुन्हा एकदा एका महिलेच्या मृतदृहाचे तुकडे दिल्लीत सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हानं वाढले आहेत. या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊलं उचलायची गरज आहे, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.

नवी मुंबईला हादरून टाकणारी घटना, दिवसाढवळ्या गोळ्या झाडून बिल्डरची हत्या

    follow whatsapp